Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

माळेगाव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: १ लाख ५६ हजारांचे हरवलेले ७ मोबाईल मूळ मालकांना केले सुपूर्द

0 7 2 4 3 7

बारामती: पुणे ग्रामीण जिल्ह्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या परिसरातुन हरवलेले तब्बल १ लाख ५६ हजार ५८५ रुपये किमतीचे ७ महागडे मोबाईल शोधण्यात माळेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, ‘तक्रार निवारण दिनाचे’ औचित्य साधून शनिवार, १३ जून २०२६ रोजी ते मूळ मालकांना परत देण्यात आले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल यांनी नागरिकांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू आणि मालमत्तेचा शोध घेऊन त्या परत करण्याबाबत विशेष आदेश दिले होते. या अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाण्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेण्यासाठी गोपनीय शाखेचे पोलीस नाईक श्री. ज्ञानेश्वर सानप यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी अत्यंत कौशल्याने तपास करत या ७ मोबाईलचा यशस्वी शोध घेतला.

खालील नागरिकांना मिळाले त्यांचे हरवलेले मोबाईल:
१. श्री. विक्रम अरविंद चांदगुडे (रा. २२ फाटा, खांडज, ता. बारामती) – सॅमसंग S21 FE (किंमत: ४०,०००/-)
२. श्री. यशवंत विक्रम मिंड (रा. शेळगाव, ता. इंदापूर) – वनप्लस नॉर्ड 4 (किंमत: ३२,९९८/-)
३. श्री. दत्तात्रय चंद्रकांत आडके (रा. काळा ओढा, शिरवली, ता. बारामती) – विवो Y400 प्रो 5G (किंमत: २४,९९९/-)
४. श्री. सनी पोपट मदने (रा. सांगवी, ता. बारामती) – ओप्पो F21s प्रो (किंमत: २१,९९९/-)
५. सौ. कल्याणी अजित झोरे (रा. सांगवी, ता. बारामती) – विवो T2 5G (किंमत: १४,६००/-)
६. श्री. नितीन रावसो जगताप (रा. पणदरे, ता. बारामती) – विवो Y29 (किंमत: १३,९९९/-)
७. श्री. अनिल भानुदास हजारे (रा. शिरवली, ता. बारामती) – विवो Y91 (किंमत: ७,९९०/-)

सदरची यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. श्री. कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. ज्ञानेश्वर सानप यांनी केली आहे.

अनेक दिवसांपासून हरवलेले आपले महागडे मोबाईल अनपेक्षितपणे पुन्हा मिळाल्याने सर्व नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला असून, माळेगाव पोलिसांच्या या तत्पर आणि यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे