अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिक
वडगाव निंबाळकर येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न; गटविकास अधिकारी किशोर माने यांच्याकडून प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक

0
6
1
1
8
4
वडगाव निंबाळकर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीला पैलू पडून त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या उदात्त हेतूने बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे भव्य तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली.
ही स्पर्धा तीन वयोगटांत घेण्यात आली होती, ज्यामध्ये ‘माझे गाव-माझी शाळा’, ‘मतदान जागृती’ आणि आधुनिक काळातील ‘AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)’ यांसारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली.
विजेत्यांची नामावली
(अंतिम निवड यादी)
१. छोटा गट (इयत्ता १ ली ते ४ थी)
या गटात देवांश लखन पाथरेकर (जि.प. मॉडेल स्कूल कोऱ्हाळे) याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ राजंनदिनी शिंदे, दुर्वा कोकरे, पार्थ खेडेकर, शिवदत्त काकडे, निर्जरा गायकवाड, रुपाली सावळे आणि आराध्या जगताप यांनी यश संपादन केले.
२. मध्यम गट (इयत्ता ५ वी ते ७ वी)
प्रथम: ईश्वरी शरद मोरे (जि.प. शाळा सोनोरी, सुपे)
द्वितीय: साक्षी संजय जगताप (नूतन महाराष्ट्र विद्यालय, पणदरे)
तृतीय: त्रिशा फिरोज तांबोळी (विद्या प्रतिष्ठान, बारामती) (या गटात अनुक्रमे शुक्ला बोरकर, प्रसन्न पिसाळ, प्रसाद खेडेकर, श्रावणी ढकाम आणि ओम मोरे यांनीही यश मिळवले.)
३. मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी)
साहिल पंकज अहिरे (अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती) याने प्रथम क्रमांक मिळवला. तर अंजली जगताप, अक्षदा ठोंबरे, जान्हवी सावळे, दिक्षा भगत आणि तमन्ना अन्सारी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत निवड यादीत स्थान मिळवले.
स्पर्धा पार पडल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला,

कार्यक्रमाच्या प्रारंभीच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामतीचे लोकप्रिय आमदार अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून स्पर्धेचा व बक्षीस वितरण समारंभाचा शुभारंभ करण्यात आला.

अध्यक्षस्थानी बारामतीचे गटविकास अधिकारी श्री. किशोर माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ पाटील उपस्थित होते. यावेळी श्री. माने यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले व जाणता राजा प्रतिष्ठान राबवत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची प्रशंसा केली.

व्यासपीठावर बारामती पंचायत समितीचे माजी सभापती श्री. अविनाश (बाबा) शिंदे, वडगाव निंबाळकरचे सरपंच श्री. सुनील ढोले, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री. जितेंद्र पवार, आणि प्राचार्य श्री. हेमंत तांबे सर आदि मान्यवर उपस्थित होते.




