ब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे पोलिसांचा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दणका; ३ दिवसांत ५१+ लाखांचा दंड वसूल!

0
6
1
1
8
4
पुणे: शहरातील विस्कळीत वाहतूक आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पुणे शहर वाहतूक विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. २७ ते २९ मार्च दरम्यान राबविलेल्या एका विशेष मोहिमेत पोलिसांनी ट्रिपल सीट, मॉडिफाईड सायलेंसर आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या धडक मोहिमेत तब्बल ५१ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असून ८५२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

शहरात वाढते ध्वनीप्रदूषण आणि कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, पोलिसांनी मॉडिफाईड सायलेंसर वापरणाऱ्या २३४ वाहनांवर कारवाई केली. विशेष म्हणजे, या मोहिमेत हे सर्व नियमबाह्य सायलेंसर जागीच काढून जप्त करण्यात आले आहेत.




