अभिव्यक्तीमहाराष्ट्रराजकियसामाजिक
पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणीताई कदम-ढोले यांचा राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्काराने सन्मान (National Excellence Award)

0
9
1
3
0
2
पुणे : जिल्हा परिषदेच्या अत्यंत लोकप्रिय आणि कार्यक्षम सदस्या तसेच एस.एम.के. फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. रोहिणी संदीप कदम-ढोले यांच्या जनसेवेची दखल घेत त्यांना मानाचा राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात वर्मा फाउंडेशन व मैत्री पीस फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा जी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. रोहिणीताईंनी सामाजिक क्षेत्रात दिलेले निस्वार्थ आणि सातत्यपूर्ण योगदान, शेतकरी बांधवांसाठी अहोरात्र केलेले प्रामाणिक सेवाकार्य, सर्वसामान्यांसाठी आरोग्यविषयक तत्परता आणि जनतेच्या हक्कांसाठी केलेली अविरत धडपड या सर्व बाबींचा हा खऱ्या अर्थाने सन्मान आहे.

रोहिणीताईंच्या या यशामागे अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठिंबा आहे. लोकनेते मा. अजितदादा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना समाजसेवेची जी संधी दिली, त्यावर त्यांनी सार्थ विश्वास निर्माण केला आहे. तसेच, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा वहिनीसाहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकसेवेची ही मोठी झेप घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रोहिणीताईंचे वडील बबनराव शिंगटे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते. त्यामुळे समाजसेवेचे आणि शिक्षणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. या संपूर्ण वाटचालीत त्यांचे पती आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांची त्यांना अत्यंत मोलाची साथ लाभली आहे.
कोणतेही पद नसतानाही केवळ सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांनी ग्रामीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेअंतर्गत जोगवडी ते कदमवस्ती (ढोलेमळा ) पाइप लाईन प्रकल्पांतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तब्बल १ कोटी ३२ लाख रुपयांची मदत मिळवून देत त्यांनी शेतकऱ्यांना आणि शेतीला मोठी उभारी दिली. कोरोनाच्या अत्यंत कठीण काळातही त्यांनी अनेक गरजूंना अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तू पुरवून माणुसकीचे मोठे दर्शन घडवले.




