अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिकसोशल मिडिया
बारामती: ‘डिजिटल अरेस्ट’ ही अफवा, सायबर भामट्यांपासून सावध राहा; पोलिसांचे बारामतीत मार्गदर्शन

0
8
0
7
2
7
बारामती : आजच्या काळात चोर घरात घुसून चोरी करण्याऐवजी मोबाईलद्वारे नागरिकांची आयुष्यभराची कमाई क्षणांत लुटत आहेत. सायबर गुन्हेगार तुमची बुद्धी नव्हे, तर घाई आणि भीतीचा फायदा घेतात. त्यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाने सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहणे ही काळाची गरज बनली आहे, असे मार्गदर्शन बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले.

बारामती तालुका पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या वतीने विद्यानगरी येथील गदिमा हॉलमध्ये शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सायबर जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांतील सुमारे १५०० ते १८०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक नारायण पवार, विद्या प्रतिष्ठान कॉलेजचे उपप्राचार्य खोत सर यांच्यासह एमआयडीसी कंपनीतील व्यवस्थापन, पोलीस पाटील, स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, एमआयडीसी प्रतिनिधी, शांतता समिती, ज्वेलर्स असोसिएशन, बँक अधिकारी-कर्मचारी आणि विद्यानगरीतील कला, वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



