गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
वडगाव निंबाळकर पोलिसांचे यश: वाघळवाडी हद्दीतील ट्रॅक्टर चोरीचा छडा; तांत्रिक तपासाद्वारे आरोपी जेरबंद ९ लाख किमतीचा चोरलेला ट्रॅक्टर मूळ मालकाला परत,

0
4
7
3
2
9
वडगाव निंबाळकर: सोमेश्वर साखर कारखाना परिसरातून शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरणाऱ्या सराईत चोरट्याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत.
या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेला ९ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त केला असून, शुभम चंद्रकांत इंगळे (रा. राजुरी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ३० जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास वाघळवाडी (ता. बारामती) हद्दीतील सोमेश्वर साखर कारखान्याच्या क्रेनयार्ड येथून प्रसाद विजय सोनवणे (रा. न्हावी, ता. भोर) यांचा ‘अर्जुन महिंद्रा’ कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर (MH 12 YN 8446) अज्ञात चोरट्याने पळवून नेला होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुन्हे शोध पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे संशयित शुभम इंगळे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.





