Breaking
आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडगाव निंबाळकर येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; ३८० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

0 6 8 3 2 2

वडगाव निंबाळकर : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार, सर्वसामान्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सुटाव्यात या उद्देशाने दि. ८ मे २०२६ रोजी मौजे वडगाव निंबाळकर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अत्यंत उत्साहात पार पडले. बारामतीचे माननीय प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात महसूल आणि इतर विविध विभागांच्या माध्यमातून सुमारे ३८० लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे थेट लाभ देण्यात आले.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला वडगाव निंबाळकरचे प्रशासक श्री. सुनील ढोले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मंडळ अधिकारी श्री. जी. एन. पारवे यांनी शिबिराचे प्रास्ताविक करून उपक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य सौ. आशादेवी वायाळ, श्री. जितेंद्र पवार, महसूल नायब तहसीलदार श्रीमती गायकवाड मॅडम यांच्यासह महसूल मंडळातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागांनुसार देण्यात आलेले लाभ:

  • महसूल विभाग: एकूण ५० लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, नॉन-क्रीमी लेयर व प्रतिज्ञापत्रे देण्यात आली. तसेच ४८ नागरिकांच्या आधार कार्डमधील दुरुस्ती व अद्यावतीकरण करण्यात आले.

  • जिवंत सातबारा मोहीम: या अंतर्गत १४८ लाभार्थ्यांना अद्यावत सातबारा व ८-अ चे वाटप करण्यात आले. यामध्ये वारस नोंद, अपाक शेरा कमी करणे, तगाई बोजे कमी करणे आणि लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत कामांचा निपटारा करण्यात आला.

  • आरोग्य विभाग: ५० नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक सल्ला व उपचार देण्यात आले.

  • पशुसंवर्धन विभाग: ४५ पशुपालकांना औषधांचे वाटप करण्यात आले.

  • कृषी व ग्रामपंचायत विभाग: कृषी विभागामार्फत १ ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले, तर ग्रामपंचायत विभागामार्फत ९ लाभार्थ्यांना जन्म-मृत्यू दाखले व घराचे उतारे देण्यात आले.

पानंद रस्ते मोहिमेला गती

​शिबिराच्या माध्यमातून पानंद रस्ते मोहिमेअंतर्गत वडगाव निंबाळकर व कोऱ्हाळे बुद्रुक शिव रस्त्यावरील शेतकऱ्यांना एकत्रित आणून प्राथमिक मोजणी करण्यात आली. हे रस्ते लवकरच पूर्णत्वास येतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

​या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी ग्राम महसूल अधिकारी श्री. पाटोळे, श्री. रंधवे, श्री. माने, श्री. साठे भाऊसाहेब आणि श्रीमती जगताप मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे