गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
कराल समाजमाध्यमावर दहशत व दादागिरीची स्टोरी तर घडेल लवकरच जेलवारी, इन्स्टाग्रामवर ‘ठोकतो, तोडतो’ अशा धमकीवजा स्टोरी लावणाऱ्या तरुणावर गुन्हा

0
6
4
8
8
8
बारामती : सरकार ग्रूप या इंस्टाग्राम वर पोस्ट करत ‘आम्ही ठोकत नाही ओ,मी तोडतो,माझा पॅटर्नच वेगळा आहे’ अशी धमकी व दहशत असलेला व्हिडिओ आणि त्याला ‘सरकार नो कॉम्प्रोमाइज ‘ असे कॅप्शन टाकून समाजमाध्यमावर व्हिडिओ लावणाऱ्या तरुणावर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
श्रीकांत अर्जन घुले (वय २५ रा. ढेकळवाडी,ता.बारामती) असे या तरुणाचे नाव असून, त्याने दि. १८ रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर जीवे मारण्याच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता.
समाजात दहशत आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील आणि आणि पोलिस जवान पो. कॉ. राजू बन्ने यांनी खातरजमा करून बन्ने यांचे तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत कायद्याचा बडगा उगारला आहे.
श्रीकांत घुले याच्यावर बीएनएस कलम ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
समाज माध्यमावर दादागिरी करणाऱ्यावर कठोर कारवाई केल्याने बारामती तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस जवान राजेश बन्ने यांनी सदरची कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पो. हवा. किशोर वीर हे करत आहेत.
“कोणाचीही दहशत, दादागिरी चालणार नाही.”
दहशत व दादागिरीची करणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन.
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोणत्याही गावात तसेच एमआयडीसी, सूर्यनगरी परिसरात कोण दादागिरी, दहशत करत असेल तर ९९२३६३०६५२ या क्रमांकावर माहिती कळवा.अशा समाजविघातक वृत्तींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
श्री.चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे.




