Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

बारामती: बंदुकीचा धाक दाखवून लुटलेले साडेसहा लाख रुपयांचे दागिने आणि रोकड पोलिसांनी केली हस्तगत; फिर्यादीला मुद्देमाल परत

0 7 4 2 8 6

बारामती: कल्याणी कॉर्नर, एमआयडीसी बारामती येथे बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही वेळातच हस्तगत केला आहे. जप्त केलेला हा सर्व मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी विवेक ज्ञानेश्वर शिंदे (रा. शिंदेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) आणि त्यांचे मित्र मोहित गवंडगावे हे कल्याणी कॉर्नर परिसरातून जात होते. त्यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून त्यांच्या डोक्याला बंदूक लावली. तसेच त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते पळून गेले.
या घटनेनंतर विवेक शिंदे यांनी त्वरित बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर २११/२०२६ नुसार बीएनएस कलम ३०९(४), ३(५) सह आर्म ऍक्ट ३, २५ प्रमाणे गुन्हा नोंदवला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपींचा माग काढत पोलिसांनी त्यांना सिनार मास कंपनीजवळून ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. रवी संजय माने (रा. कुंभारकर वस्ती, वंजारवाडी), श्रीकांत अर्जुन घुले (खचापट्‍टा, बारामती), अभिषेक भाऊसाहेब ठोंबरे (खताळपट्टा, बारामती) आणि अतुल मोहन भोलनकर (रा. कुंभारकर वस्ती, वंजारवाडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या आरोपींकडून लुटलेले सर्व दागिने आणि रोकड असा पूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी विवेक शिंदे यांना नुकताच परत देण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक भगत, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार खारतोडे, एकसिंगे, ढवान, महिला हवालदार भारती खंडागळे, पोलीस शिपाई निलेश वाकळे, मनोज पवार आणि दराडे यांच्या पथकाने या कामगिरीत विशेष सहभाग नोंदवला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे