Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत पुणे ग्रामीण घटकाची पोलीस वृंद परिषद संपन्न अधिकारी व अंमलदारांशी साधला थेट संवाद; अडीअडचणींचे केले जागेवरच निराकरण

0 5 9 3 3 9

पुणे : महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते (भा.पो.से.) यांच्या अध्यक्षतेखाली पुणे ग्रामीण घटकाची ‘पोलीस वृंद परिषद’ नुकतीच पार पडली. या महत्त्वपूर्ण परिषदेत मा. पोलीस महासंचालकांनी तळागाळातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या विविध अडीअडचणी आणि समस्या समजून घेत त्यांचे तातडीने निराकरण केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंह गिल (भा.पो.से.) यांनी केले. यानंतर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी (भा.पो.से.) यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले.

पोलीस दलातील समन्वय आणि संवाद वाढवण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक श्री. आकाश पवार यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तर, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या विशेष वृंद परिषदेला बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, पोलीस उपअधीक्षक (गृह, उपमुख्यालय) श्री. दिलीप शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री. कोळी यांच्यासह पुणे ग्रामीण जिल्ह्यातील बहुसंख्य पोलीस अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे