Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसामाजिक

वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाकडून वैद्यकिय सेवेबद्दल बारामती तालुका कार्यकारिणीचा आरोग्यदुत म्हणुन सन्मान

0 1 6 9 9 3

बारामती : शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष,खा.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी तीन दिवशीय मेळाव्यात वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डाॅक्टर,वैद्यकिय संस्था,रुग्णसेवक यांचा सन्मान सोहळा नुकताच कोल्हापूर येथील सुंदर व भव्य लोटस हाॅलमध्ये पार पडला.

यावेळी विनामोबदला,कोणतेही मानधन न घेता गोर गरीब व गरजू रुग्णांसाठी भरीव असे कार्य करणाऱ्या रुग्णसेवकांचा मा.उद्योग मंत्री उदय सामंत,आ.राजेश क्षिरसागर,मा.आ.शहाजी बापु पाटील,आ.सुहास बाबर माजी आ.सुजित मिनचेकर,शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे,श्री.मंगेश चिवटे,उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख,श्री.रामहरी राऊत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,कार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य,श्री.प्रशांत साळुंखे, संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र व इतर मान्यवरांच्या हस्ते आरोग्यदुत / रुग्णसेवक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देवुन सन्मान करण्यात आला.

बारामती तालुका वैद्यकीय मदत कक्ष यांनी दिलेल्या रुग्णसेवेबद्दल बारामतीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला,

बारामती तालुक्याच्या वतीने श्री.मंगेश खताळ यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली,त्यांनी आपल्या मनोगतात रुग्णसेवक म्हणून कार्य करण्याची पद्धत सांगीतली, बारामती तालुक्यात जवळपास 150 रुग्णसेवकांचे संघटन तयार करून एक मजबूत अशी टिम बनवली आहे व त्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 200 ते 250 रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देत जवळपास अडीच कोटी रुपये वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचे सांगितले.

आम्हाला मिळालेला सन्मान हा आमचा नसुन बारामती तालुक्यात रुग्णसेवा करणाऱ्या सर्व रुग्णसेवकांचा आहे तसेच रुग्णसेवा हिच आमची ओळख आहे असे बारामती वैद्यकिय मदत कक्षाकडून यावेळी सांगण्यात आले,

हा सन्मान स्विकारण्यासाठी श्री.मंगेश खताळ समन्वयक,पुणे जिल्हा ग्रामीण,सतिश गावडे, समन्वयक,पुणे जिल्हा,सौ.शशिकला काळे,पुणे जिल्हा उपसमन्वयक महिला आघाडी. सौ.सुनिता डोंबाळे बारामती शहर महिला आघाडी,सौ.विद्याराजे गायकवाड जिल्हा प्रमुख महिला आघाडी इंदापूर,

श्री.हनुमंत देवकाते(पाटील)बारामती तालुका अध्यक्ष, श्री.सुशीलकुमार अडागळे उपसमन्वयक बारामती तालुका, बारामती शहर प्रमुख कृष्णमूर्ती जगताप,आरोग्य सहायक प्रविण(सोनु)माकर, सौ.ज्योती भागवत गाढवे इंदापूर तालुकाप्रमुख सौ.सुरेखा लोहार इंदापूर तालुका प्रमुख,आरोग्य सहाय्यिका सौ.कमल लोंढे,सौ.कल्पना जाधव उपस्थित होते.या कार्यक्रमा साठी पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,रुग्णसेवक यांच्यासह कोल्हापुर,सांगली,सातारा,पुणे, सोलापुर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग येथील नामांकित डाॅक्टर,व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

दरम्यान महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यास व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे