Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

बारामतीत मोठी खळबळ! ‘मी पुढारी आहे…’ म्हणत विधवेवर शारीरिक अत्याचार; उद्योजकांना ब्लॅकमेल करण्यासाठी धमकावणाऱ्यावर गुन्हा दाखल!

0 7 0 1 3 0

बारामती : “मी पुढारी आहे, तुला इथे सुखाने जगू देणार नाही…” अशी थेट धमकी देत एका विधवा महिलेच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून तिच्याकडे वेळोवेळी शरीरसुखाची मागणी केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये उघडकीस आला आहे.

एवढेच नाही, तर बारामतीतील  उद्योजकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यासाठी या पीडित महिलेवर दबाव टाकण्यात आला. या संतापजनक प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात एकावर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षीय पीडित महिलेने बारामती तालुका पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत हा भयंकर प्रकार घडला. आरोपी किशोर मासाळ याने पीडित महिलेशी ओळख असल्याचा गैरफायदा घेतला. महिलेचे पती मयत असल्याने आणि ती एकटीच असल्याचा फायदा घेत, त्याने वेळोवेळी तिच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्याशी लगट करून लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले.

पीडित महिलेने या प्रकाराला विरोध केला असता आरोपीने दहशतीचा वापर केला. “मी पुढारी आहे, माझे खूप ओळखी आहेत. तुला खोट्या गुन्ह्यात अडकवीन,” अशी धमकी त्याने दिली. तसेच, “तुझे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत, तू मी सांगेल तसे ऐक. बारामती येथील उद्योजकांना ब्लॅकमेल करून त्याच्याकडून मला पैसे काढून दे, नाहीतर हे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेन,” अशी भयंकर धमकीही आरोपीने दिली. याशिवाय आरोपीने वेळोवेळी महिलेचा पाठलाग करून तिला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलिसांनी आरोपी किशोर मासाळ याच्यावर बी.एन.एस. कलम ३३२ (c), ७४, ७५, ७८, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) नुसार (गु.र.नं. २५३/२०२६) गुन्हा दाखल केला आहे. दाखल अंमलदार म्हणून म.पो.हवा.पवार यांनी काम पाहिले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत.
या गंभीर घटनेमुळे बारामती शहरात व परिसरात मोठी खळबळ उडाली असून, एका राजकीय पुढारी म्हणवून घेणाऱ्या इसमाच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे