गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
माळेगाव बुद्रुक येथे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला; पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

0
5
9
3
3
9
बारामती : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील बास्केट बाजारसमोरील मोकळ्या जागेत एका कंत्राटदारावर पाच अज्ञात इसमांनी लाकडी काठी आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये पाच अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दिलीप धनसिंग जगताप (वय ५२, रा. धुमाळवाडी/बारामती) हे शेती व कंत्राटदारीचा व्यवसाय करतात. बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:५५ च्या सुमारास जगताप हे माळेगाव बुद्रुक येथील बास्केट बाजार समोरील मोकळ्या जागेत गेले होते. यावेळी २५ ते ३० वयोगटातील पाच अज्ञात इसम त्या ठिकाणी आले. त्यांनी “आमचे पैसे का देत नाही?” असे म्हणून जगताप यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.




