वडगाव निंबाळकर येथे गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायक तरुण मंडळातर्फे आरोग्य तपासणी शिबिर.
अष्टविनायक तरुण मंडळाचा हा उपक्रम म्हणजे सामाजिक कार्यात आणखी एक पाऊल आहे, ज्यातून गरजू व गोरगरीब रुग्णांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व मदत झाली.

बारामती: अष्टविनायक तरुण मंडळ (राजवाडा चौक, वडगाव निंबाळकर या मंडळाची स्थापना सुमारे ६० वर्षापूर्वी साली झाली, आणि तेव्हापासून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती, पर्यावरण संवर्धन, खेळ, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
२०२४ सालच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने, मंडळाने आणखी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेतला. तो म्हणजे फिजिओथेरपी सत्र आणि त्वचारोग तपासणीचे आयोजन केले, ज्याचा उद्देश स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणे हा होता.
या शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे फलटणचे अनुभवी त्वचारोग तज्ञ डॉ.सुनील लोणकर आणि बारामतीचे प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. रोहन अकोलकर यांचा सहभाग होता. त्यांनी शिबिरात आलेल्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली,त्यांनी विशेष करून सांधेदुखीवर तसेच हाडांच्या इतर समस्यांवर मार्गदर्शन केले,तर डॉ.लोणकर यांनी त्वचारोगावरील तपासणी आणि औषधोपचार व मार्गदर्शन केले.
अष्टविनायक तरुण मंडळाने या शिबिरासाठी औषधे आणि तपासणीची साधने मोफत उपलब्ध करून दिली.दोन्ही डॉक्टरांनी पुढील तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना पन्नास टक्के सवलत दिली जाईल असे जाहीर केले. या शिबिरात एकूण १५० लोकांनी सहभाग घेतला, ज्यामध्ये ७० लोकांनी त्वचारोग तपासणी केली, तर ८० लोकांनी फिजिओथेरपी तपासणीत भाग घेतला.
या शिबिरामुळे गावातील नागरिकांना त्यांचे आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधोपचार करून घेण्याची संधी मिळाली आणि आवश्यक ते मार्गदर्शन मिळाले.
मंडळाचे अध्यक्ष,राजेंद्र शिंदे.यांनी सर्व रुग्णांचे तसेच डॉक्टरांचे आभार मानले. या उपक्रमासाठी डॉक्टर भापकर यांचे विशेष सहकार्य लाभले.याप्रसंगी मंडळाचे खजिनदार विराज राजेंनिंबाळकर, उदय हिरवे, विजयकुमार शिलवंत, मुकुंद बोकील, राजेंद्र काकडे, हेमंत बोकील, ऋषिकेश शिंदे, हर्षद शिंदे, पुष्कराज राजेंनिंबाळकर, ऋतुराज बोकील,भूपेंद्र जाधव, युवराज आडके, मंडळातील सर्व महिला सभासद तसेच वडगावकर नागरिक उपस्थित होते.