
“दैनिक वसंतसागर” चे संपादक आनंदा सुतार यांना आदर्श पत्रकार पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार जाहिर
बारामती : पर्सन ऑफ द ईयर २०२५ समाज गुणगौरव पुरस्कार प्रदान समारंभ सामाजिक सेवाभावी संस्था आदर्श फाऊंडेशन यांच्या वतीने पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना आदर्श पत्रकार पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार जाहीर झाले आहेत.यात दैनिक लोकमतचे चे (पत्रकार) तसेच साप्तहिक वसंतसागर चे मुख्य संपादक आनंदा सुतार यांच्या सह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६० जणांना विविध पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार यांनी दिली.

महिला दिनाचे औचित्य साधून शनीवार (दि.८) रोजी दुपारी दोन वाजता दसरा चौक येथील शाहु स्मारक भवन कोल्हापूर येथे सभागृहात मा. निवेदिता माने, वहिनीसाहेब माजी खासदार, कोल्हापूर मा. एम. के. गोंधळी सर, निवृत्त शिक्षण सहसंचालक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे हे २२ वे वर्ष आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. भगवानराव साळुंखे, माजी शिक्षक आमदार हे राहणार आहेत. या वेळी प्रमुख पाहुणे मा. निवेदिता माने, वहिनीसाहेब माजी खासदार, कोल्हापूर मा. एम. के. गोंधळी सर, निवृत्त शिक्षण सहसंचालक,विशेष उपस्थिती मा. श्रीमती नेत्रदीपा पाटील, प्रदेशाध्यक्ष मराठा युवा संघर्ष समिती,मा. सुदामराव गायकवाड संस्थापक अध्यक्ष, श्री संत भोजलिंग काका सुतार समाज सेवा मंच मा. सौ. शर्मिला वंडकर, सिने अभिनेत्री, कोरिओग्राफर मा. रवींद्र रायकर शहराध्यक्ष अखिल महाराष्ट्र सुतार महासंघ पुणे,मा. शिवाजी सुतार, प्र. संपर्क प्रमुख विश्वकर्मा राष्ट्रीय वंशीय सेना गोवा राज्य मा. बाळासाहेब लोहार, प्रसिद्ध उद्योजक, सातारा मा. विलास आंग्रे, सल्लागार अशासकीय तांत्रिक माध्यमिक शिक्षक कर्मचारी महासंघ,मा. डॉ. दगडू माने, पत्रकार सिने अभिनेते आदी उपस्थित रहाणार आहेत.

पुरस्काराचे मानकरी
मा.सुदामराव गायकवाड,मा. रवींद्र रायकर,मा. सौ. शर्मिला वंडकर,मा. शिवाजी सुतार,मा. बाळासाहेब लोहार,सौ. प्रज्ञा गिरी,मा. अशोक सुतार,मा. अर्जुन जाधव,मा. वैद्य निलेश कुरकुटे,मा. रामचंद्र सुतार,मा. प्रशांत पाटील,मा. सौ. सरिता शेडगे,मा. कृष्णा म्हेत्रे,मा. प्रा. डॉ. वंदना लोंढे,मा. अमोल लोहार,मा. डॉ. शेख अख्तर हसन अली,मा. तुकाराम कांबळे,मा. सौ. तेजस्विनी चव्हाण,मा. शंकर पाटील,मा. नामदेवराव मगदूम,मा. रंगराव पाटील,मा. सौ. रूपाली शेडगे,मा. भारत माळी,मा. आनंदा सुतार,मा. सुरेखा माने,मा. लालासाहेब पाटील,मा. रमेश साबळे,मा. सौ. शितल शिंदे,मा. सौ. पुनम मदने,मा. परशुराम घाडगे,मा. स्वाती लोंढे-चव्हाण,मा. अर्जुन मदने,मा. रावसाहेब कदम,मा. सौ. प्रतिभा पाटील,मा. नितीन जाधव,मा. अविनाश जाधव,मा. राजयोगिनी चोरडिया आदर्श जि. प. शाळा सावर्डे बु।।,मा. नागेश सूर्यवंशी,मा. श्वेता शेठ,मा. नीलिमा जगताप,मा. डॉ. तुकाराम देवकर आदर्श कृषी पर्यटन केंद्र आमराई,मा. श्रीदेवी पाटणकर,मा. राजकुमार पाटसुते,मा. डॉ. नीलम पाटील,मा. नम्रता गुरव,मा. रवींद्र लोंढे,मा. श्रीमती सुधाताई कांबळे,मा. राकेश कांबळे,मा. आनंदा परळेकर,मा. प्रा. गंगाधर माळी,मा. डॉ. समृद्धी मेथा,मा. डॉ. शेख फर्जाना,मा. शेख रिजवाना,मा. अनवर इनामदार,मा. शंकर मारुती पाटील,मा. अनुश्री खांडेकर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा