बारामती : पुणे जिल्हा परिषद पुणे, यांच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०२४ -२५ केंद्र स्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबूत येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे, निंबूत ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमरदीप काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, विक्रम काकडे, मदनराव काकडे, भाऊसो कोळेकर, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार संभाजी काकडे,विकास जाधव, शैलेश बनसोडे, प्रणव बनसोडे, सोनू मोरे, इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमरदीप काकडे व नंदकुमार काकडे यांच्या शुभहस्ते खेळाच्या मैदानाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धांमध्ये लिंबूचमचा,बेडूक उड्या ,वेशभूषा स्पर्धा, बडबडगीत गायन स्पर्धा, ५० मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी ,लंगडी, कविता गायन ,खो-खो, लोकनृत्य स्पर्धा,भजन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा , बुद्धिबळ स्पर्धा,लेझीम अशा विविध खेळांचा या स्पर्धांमध्ये समावेश होता.

या स्पर्धेमध्ये केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांनी भाग घेतला यामध्ये खालील शाळा व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
बक्षीस विजेत्या स्पर्धेचा प्रकार, विद्यार्थ्याचे नाव व शाळेचे नाव खालील प्रमाणे
चमचा लिंबू स्पर्धा ज्ञानेश्वरी संजय खुडे जिल्हा परिषद शाळा निंबूत
बेडूक उडी स्पर्धा (मुले) ध्रुव अमोल जाधव, जिल्हा परिषद शाळा निंबूत (मुली) पायल राजेश जगताप, शाळा कोळी वस्ती.
वेशभूषा स्पर्धा, जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी
बडबड गीत गायन स्पर्धा,जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी.
५० मीटर धावणे, पवन निगडी जिल्हा परिषद शाळा निंबूत
उंच उडी (मुले) अथर्व प्रमोद खंडाळे,जिल्हा परिषद शाळा निंबुत (मुली) प्रांजल लकडे,जिल्हा परिषद शाळा खंडोबाची वाडी.
लांब उडी स्पर्धा (मुले)अथर्व प्रमोद खंडाळे, शाळा निंबूत. (मुली)प्रांजल लकडे, शाळा खंडोबाची वाडी.
लंगडी स्पर्धा, जिल्हा परिषद शाळा, गडदरवाडी.
कविता गायन स्पर्धा,जिल्हा परिषद शाळा, निंबूत.
खो खो (मुले) जिल्हा परिषद शाळा, निंबूत.
खो खो मुली, जिल्हा परिषद शाळा, गडदरवाडी.
भजन स्पर्धा, शाळा कोळी वस्ती.
लोकनृत्य स्पर्धा, जिल्हा परिषद शाळा, वाघळवाडी.
वक्तृत्व स्पर्धा, कैवल्य मधुकर बनसोडे, जिल्हा परिषद शाळा, निंबूत.
प्रश्नमंजुषा स्पर्धा, जिल्हा परिषद शाळा,कोळी वस्ती.
लेझीम स्पर्धा, जिल्हा परिषद शाळा, निंबूत
बुद्धिबळ स्पर्धा, रणवीर शशिकांत बनसोडे,जिल्हा परिषद शाळा, निंबुत.
वरील सर्व खेळांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व शाळांचे केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा