श्री शहाजी विद्यालय,सुपे(बारामती)येथे गुणवंत विद्यार्थ्यांवर बक्षीसांची लयलूट.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे या संस्थेच्या ८४ व्या 'वर्धापन दिना'च्या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभ.

सुपे,बारामती:पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे या संस्थेच्या ८४ व्या ‘वर्धापन दिना’च्या निमित्ताने श्री शहाजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुपा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.अश्विनी सकट या होत्या. उपस्थितांमध्ये सुपा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.तुषार हिरवे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.ज्ञानेश्वर कौले,बारामती पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती.नंदा खैरे,सामाजिक कार्यकर्ते श्री.राहुल भोंडवे,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत भोसले,वढाणे ग्रामपंचायत सरपंच श्री.सुनिल चौधरी,दंडवाडी ग्रामपंचायत सदस्य महेश चांदगुडे,सुपा ग्रामपंचायत सदस्य सौ.पूजा निकाळजे,सौ.अश्विनी जाधव,श्री.सोमनाथ कदम,श्री.विशाल चांदगुडे तर ग्रामस्थांमध्ये सौ.शारदा दुर्गे,श्री.प्रविण दुर्गे,सौ.वैशाली बारवकर,श्रीम.सपना दोशी,श्री.अनिल शहा,श्री.अशोक लोणकर,श्री.सुभाष चांदगुडे,श्री.यशवंत चिपाडे,श्री.हनुमंत चांदगुडे,श्री.सूर्यकांत कुंभार,श्री.बापू लोणकर,श्री.किरण तावरे,श्री.फडतरे गुरुजी,श्री.विलास धेंडे,श्री.शुभम खैरे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी दूध संघ बारामतीचे माजी संचालक श्री.हनुमंत शेळके,श्री.नितीन संभाजी खैरे,श्री.दत्तात्रय बोरकर,श्रीम.निलादेवी कुंभार,श्रीम.सपना दोशी,श्री.सुदाम नेवसे,श्री.मोरेश्वर पानसरे,श्री.अशोक लोणकर,श्री.सूर्यकांत कुंभार,श्री.कमलेश भंडारी आदि देणगीदारांनी इयत्ता १०वी व १२वी तील प्रथम,द्वितीय,तृतीय येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सुमारे ८७,००० रुपये रोख रक्कम देऊ केली.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात अशाप्रकारे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी अशाच प्रकारची बक्षीसे देण्याची ग्वाही दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.एस.ए.लोणकर,उपमुख्याध्यापक श्री.एस.बी.जमदाडे,श्री.आय.एच.खान यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनिअर विभागप्रमुख श्री.आर.डी.पानसरे,सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.एम.एस.गायकवाड यांनी केले.मान्यवर सत्कार व बक्षीस वितरणाचे नियोजन श्री.ए.एल.पवार व सौ.ए.ए. पलांडे यांनी केले.आभार सौ.एस.ए.मदने यांनी आभार व्यक्त केले.