अ.नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी: देवळाली प्रवरा ता.राहुरी येथील आठवडे बाजारात दोन तरुणांनी १५ ते २० मोबाईल चोरले. आणि चोरी करताना बाजारातील काही तरुणांनी रंगेहाथ पकडले यानंतर या दोन तरुणाची नागरिकांकडून धुलाई करण्यात आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की,देवळाली प्रवरा आठवडे बाजारात दोन मोबाईल चोरांनी धुमाकुळ घातला.दुपारी ३ वाजता भाजीपाला घेत असलेल्या बाजारकरुचा खिशातील मोबाईल चोरताना दुसऱ्या बाजारकरुने रंगेहाथ पकडले.दोन्ही चोरांना रंगेहाथ पकडले.त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.या दोन चोरांना पकडून बाजाराच्या बाहेर आणल्यानंतर नागरीकांनी त्यांची धुलाई केली.

काही जागृत नागरिकांनी दोन्ही चोरांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती केली.परंतु मागील काही वर्षांपासून देवळाली प्रवरा पोलिस दूरक्षेत्र बंद असल्याचे लक्षात आले. खरंतर या पोलिस चौकीसाठी सहा.पोलिस उपनिरीक्षक यांची नियुक्ती असतानाही या पोलिस चौकीकडे एकही पोलिस फिरकत नाही.अशी नागरीकांची तक्रार होती व आहे.

अखेर राहुरी पोलिस ठाण्यात एका सुज्ञ नागरिकाने फोन करुन मोबाईल चोरांची माहिती दिली.त्यानंतर तब्बल तीन तासाने म्हणजे सायंकाळी ६;३० वा पोलिस देवळाली प्रवरात पोहचले.दोन्ही चोरांना पोलिसांनी ताब्यात घेवून राहुरी पोलिस ठाण्यात घेवून गेले.

पोलिस चौकी बंद असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पकडलेल्या मोबाईल चोरां विरोधात रात्री उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

देवळाली प्रवरातील पोलिस चौकी गेल्या दोन वर्षा पासुन बंद अवस्थेत असल्याने देवळाली प्रवरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.
मध्यंतरी मुलीस पळून नेल्याने दोन गटात तुफान हाणामारी होऊन जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली होती.हि घटना ताजी असतानाही पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलिस चौकी उघडी ठेवण्या बाबत कोणताही निर्णय घेतला नाही.

देवळाली प्रवरा दूरक्षेत्र लवकर व सुयोग्य पद्धतीने सुरू राहवे व अशी स्थानिक पातळीवर तीव्र मागणी आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा