सांगवी, बारामती : तालुक्यातील सांगवी गावचे सामाजिक कार्यकर्ते व युवा नेतृत्व श्रीकांत दिनकर तावरे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट बारामती तालुका युवक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार ,मा.आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली .
या वेळी युवा नेते युगेंद्र दादा पवार यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी पक्षाचे अध्यक्ष एस एन बापु जगताप,युवक अध्यक्ष प्रशांत बोरकर ,संदिप सुतार ,आकाश परकाळे ,शुभम गाडेकर ,धनराज निंबाळकर ,अमर जाधव ,अमोल पवार ,राहुल घाडगे ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

“पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य रितीने सांभाळून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करेन व सामान्य नागरिकांच्या अडचणी तसेच त्यांच्या साठी एक कार्यकर्ता म्हणून मी काम करेन असे तावरे यानीं सांगितले”.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा