
बारामती: खामगाव दिनांक 17-5- 2025 रोजी सर्किट हाऊस येथे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचं सकल मातंग समाज बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी शेगाव येथील लहुजी नगर रहिवासी अतिक्रमण काढण्यात आलेले असून सदर या अतिक्रमणधारकांना पुनर्वसनाच्या माध्यमातून घरे मिळण्याबाबत मागणी करण्यात आली तसेच मंत्री महोदय यांनी ही सर्व बाब समजून घेतली व या सर्व अतिक्रमण धारक बेघर परिवारांना पुनर्वसनाच्या माध्यमातून तात्काळ पर्यायी व्यवस्था कशी होईल याबद्दल शासन कटीबद्ध राहील असे आश्वासन दिले.

तसेच आझाद मैदान मुंबई येथे 20 मे 2025 रोजी होणार असलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण जन आक्रोश महाआंदोलनाबद्दल चर्चा करण्यात आली तसेच मोर्चाच्या पत्रिका घेऊन प्रकाशित करण्यात आल्या याप्रसंगी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते महादेव अडायके तसेच मातंग समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे लहुजी सावळे स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष युवा नेते कृष्णा नाटेकर सामाजिक कार्यकर्ते गजानन सोनवणे युवा नेते उमेशजी बाभुळकर समन्वय समिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सागर भाऊ सुरळकर कार्तिक नाटेकर व आदी सह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा