बारामती: माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने आचार संहिता कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या करीत दिनांक २७/१०/२०२४ रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान माळेगाव बु नगरपंचायत हद्दीत निरा- बारामती मार्गाने गोफणेवस्ती फाटा ते राजहंस चौक,आण्णाभाऊ साठे चौक व माधवानंद थिएटर चौक असा रूट मार्च घेण्यात आला.

याचबरोबर मौजे सांगवी गावात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ते शिरवली रस्ता या मुख्य मार्गावर आणि मौजे निरावागज गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा निरा वागज ते मस्जिद असाही रूट मार्च घेण्यात आला.

या रूट मार्चमध्ये माळेगाव पोलीस स्टेशनचे तीन अधिकारी व २० अंमलदार, आणि केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी व २४ जवान, तसेच पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण यांच्यातील दंगल नियंत्रण पथक मधील १५ अंमलदार सहभागी झालेले होते.
अशी माहिती सचिन लोखंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक,माळेगाव पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळाली आहे.


बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा