आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार.
श्री.बाबलाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द,तालुका पुरंदर,जिल्हा पुणे,या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कैलास भैरु नेवसे यांना पुरस्कार जाहीर.

0
1
4
5
7
0
निंबुत, बारामती:पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे, यांच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्कार सन २०२४-२५ श्री.बाबलाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय पिंपरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कैलास भैरु नेवसे यांना रविवार ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे,येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

श्री कैलास भैरू नेवसे मुख्याध्यापक यांचे विद्यालयासाठी दिलेल्या योगदानासाठी सार्थ निवड झाल्याबाबत पिंपरे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले,

तसेच निंबुत ग्राम विकास प्रतिष्ठान निंबुत या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री.सतीश भैय्या काकडे देशमुख, उपाध्यक्ष श्री.भिमराव बनसोडे आणि संस्थेचे मानद सचिव श्री.मदनराव काकडे देशमुख याच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.