नीरा: तालुका पुरंदर येथे शिवरत्न वीर शिवाजी महाले यांच्या ३८९ व्या जयंती उत्सव व त्या निमित्त सामाजिक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मर्दानी खेळ, दांडपट्टा,लाठीकाठी,अशा खेळांचा समावेश होता.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले यामध्ये इयत्ता दहावी त चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मान करण्यात आला, तसेच मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत राज्य पातळीवर क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
श्री.शरद बापू क्षीरसागर यांना उद्योजक पुरस्कार तसेच समाज भूषण पुरस्कारात श्रीमती शोभा मदन काटकर, गंगाधर नामदेव सूर्यवंशी, यशवंत गणपत ईभाड,नंदकुमार महादेव कारवेद, नितीन बबन मगर, यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
दरम्यान वीर जिवाजी महाले यांच्यावर श्री, सयाजी अण्णासो झुंजार (कोल्हापूर) तसेच श्री सुशील गायकवाड उपाध्यक्ष पुरंदर तालुका यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उपस्थितांमध्ये पुरंदरचे आमदार संजय जगताप हे उपस्थित होते त्यांच्यासह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिंगबर दुर्गाडे, हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यांच्यासह राजेशभाऊ काकडे उपसरपंच निरा,सौ.तेजश्री वि.काकडे सरपंच निरा.दत्ताजी चव्हाण,अनिल चव्हाण, शंकरराव मर्दाने,रामचंद्र गायकवाड,नितीन राऊत सर,राहुल मगर अध्यक्ष पुरदंर तालुका,भारत मोरे युवक अध्यक्ष पुणे जिल्हा,सागर इभाड उपस्थित होते.जयंती उत्सवासाठी पुणे,सातारा,कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातून नाभिक समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील चंद्रकांत जाधव सर,
धिरण पवार, पांडुरंग पवार, जीवन राऊत, व भरत शिरसागर हे कार्यकर्तेही या कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रस्ताविक नितीन राऊत यांनी केले,तर आभार सचिव आदिनाथ गायकवाड मानले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा