राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने वडगाव निंबाळकरचे विद्यमान सरपंच सुनील दत्तात्रय ढोले सन्मानित.
राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह तर्फे राज्यातून तीन सरपंचांची आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड.

बारामती: आपल्या कार्यातून आपण करत असलेल्या लोकसेवेतून आपल्या कार्याची नवी ओळख करून दिल्याबद्दल व त्या कार्याला एका वेगळ्या उंचीवर नेल्याबद्दल राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियासमूहातर्फे याची नोंद घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार २०२४/२५ देण्यात आले
हा पुरस्कार सोहळा दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी ‘एस फोर जी हॉटेल’ पुणे सोलापूर रोड, थेऊर फाटा येथे भव्य दिव्य वातावरणात संपन्न झाला. या राज्यस्तरीय पुरस्काराचे राज्यातील ३६ जिल्ह्यातील ६५ मानकरी ठरले यात आदर्श सरपंच,आदर्श मेंढपाळ,आदर्श शिक्षक, पर्यावरण मित्र, क्रीडा रत्न, समाजभूषण, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले,या मध्ये वडगाव निंबाळकर गावचे विद्यमान सरपंच सुनील दत्तात्रय ढोले यांना आदर्श सरपंच या क्षेत्रातला मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सन्माननीय व्यक्तींचा त्यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांना प्रोत्साहन देणे हाच या मागचा उद्देश आहे व यातून त्यांच्याकडून अजून चांगले कार्य घडावे अशी भावना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल कुंदनार यांनी व्यक्त केले.
‘कोणताही सन्मान हा मोठाच आहे त्याचा अभिमान आहेच पण या सन्मानांसोबत करत असलेल्या कार्याबद्दलची जबाबदारी वाढते’ सुनील ढोले.सरपंच, वडगाव निंबाळकर