Breaking
विशेष लेख

प्रत्येक विद्यार्थ्याने राज्यघटना समजून आत्मसात करायला हवी. अ‌‌ॅड गणेश आळंदीकर

'राज्यघटनेचे महत्त्व' या विषयावर मार्गदर्शन

0 1 4 5 7 0

बारामती: राज्यघटना व घटनेने दिलेले मूलभूत अधिकार याबाबत प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असली पाहिजे असे मत बारामतीतील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. गणेश आळंदीकर यानी व्यक्त केले.

तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील शरदचंद्र पवार इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ‘राज्यघटनेचे महत्त्व’ या विषयावर डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांना राज्यघटनेचे महत्त्व याविषयावर अ‌‌ॅड.आळंदीकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के.हजारे,प्रा.अमर घाडगे,प्रा.दिग्विजय चव्हाण सर्व कर्मचारी व सुमारे १५० विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

ॲड आळंदीकर पुढे म्हणाले राज्यघटना हा विषय फक्त परीक्षेच्या अभ्यासापुरता मर्यादित नसून तो दैनंदिन जीवनात आत्मसात करण्याच्या विषय आहे, त्यासाठी प्रत्येकाने राज्यघटना व त्यातील मुलभुत अधिकार समजून घेतले पाहिजेत.

जगातील सर्वात मोठी राज्यघटना भारताची असून हा एक पवित्र ग्रंथ आहे.संपूर्ण राज्यघटनेचा गाभा उद्देशिकेमध्ये असून प्रस्तावना समजून घेतली तर पंडीत नेहरूंना त्यांना हवा असलेल्या भारताचे चित्र स्पष्ट होते. घटना समिती अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद ,मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून तयार झालेल्या घटनेतील वेळोवेळी झालेले बदल(घटना दुरुस्ती), राज्यघटनेचे फायदे त्याची वैशिष्ठे याबाबत सविस्तर मार्गदर्शन ॲड आळंदीकर यानी यावेळी केले.

प्रसंगी प्राचार्य एस.के.हजारे यांनी स्वागत व आभार मानले.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे