आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगांव निंबाळकर प्रशालेमध्ये पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारिणीची सभा संपन्न.
दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी प्रशालेमध्ये सभा संपन्न

0
1
4
5
7
6
बारामती: विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, शारीरिक अर्थातच सर्वांगीण विकास साधण्यासाठी पालक – शिक्षक संघाची स्थापना करण्यात येते. शिक्षकांबरोबरच पालकांचीही तितकीच जबाबदारी असते हे आपल्या प्रास्ताविकेमधून श्री अनिल पाटील सर यांनी सांगितले. सर्व उपस्थित पालकांचे स्वागत करून, उपस्थित पालक शिक्षक यांच्यातून कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य हेमंत तांबे यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री सुशीलकुमार अडागळे यांची सर्व उपस्थित पालकांनी निवड केली .
श्री हरिश्चंद्र हनुमंत लोणकर यांनी अनुमोदन दिले. पालक शिक्षक संघाचे सचिव श्री अनिल पाटील सर व सहसचिव सौ.सृष्टी नितीन रणपिसे यांची निवड करण्यात आली यासाठी सौ.दिपाली वैभव मदने यांनी अनुमोदन दिले.
पर्यवेक्षक श्री हेमंत बगनर सर यांनी विद्यार्थी उपस्थिती बाबत मार्गदर्शन केले. याचबरोबर पालक सभेसाठी सुद्धा पालकाने शंभर टक्के उपस्थित राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच घटक चाचणी निकाल तयार असून विद्यार्थ्यांकडून पालकांपर्यंत पोहोचविला आहे प्रथम सत्र परीक्षा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री.हेमंत तांबे सर यांनी माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम, परसबाग, स्वच्छ सुंदर शाळा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक विभाग अशा विविध विभागांद्वारे प्रशालेमध्ये अनेक उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे पालकांनी लक्ष द्यावे, विद्यार्थी दररोज गणवेशामध्ये शाळेत उपस्थित राहावा, अशा विविध विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. वर्ग निहाय पालक सभा पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहेत.
तसेच प्रशालेच्यावतीने बारामती तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये १२८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ओम यादव इयत्ता नववी अ मधील विद्यार्थ्याची जिल्हा स्तरावर निवड झाली हेही सांगण्यात आले. काही पालकांनी प्रशाले कडून विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात यावीत अशी मागणी केली.सौ.देशमुखे मॅडम यांनी उपस्थित सर्व कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांचे आभार व्यक्त केले