बारामती : आजचे युग सोशल मिडिया चे आहे ते वापरत असताना तरुणींनी सोशल मिडिया,मोबाईल वापरताना काळजी घेतली पाहिजे. ज्यामध्ये स्वतःचे वैयक्तिक फोटो, वैयक्तिक माहिती यांचा कसा गैरवापर केला जातो व त्यातून मुलींना ब्लॅकमेल केले जाते. प्रेमप्रकरणा मध्ये मुली आईवडील यांना विरोध करून पळून जाऊन लग्न करतात. परंतु थोड्याच दिवसात त्यांना पश्चात्ताप करायची का वेळ येते या विषयी माहिती दिली.

फसवेपणाला भूलथापांना मुलींनी बळी पडू नये. आपल्या अभ्यासावर आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करून सरकारी नोकरीत, स्पोर्ट , आर्मी मध्ये आता मुलींना आरक्षण दिले आहे. शिक्षण सुद्धा मोफत झालेले आहे.त्यामुळे त्यांनी आपल्या पायावर उभे राहून सक्षम बनले पाहिजे. जेणे करून तुमच्या भावी आयुष्यात तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही.
तुझ्या कोणी मुली किंवा ज्या तरुणी अशा अडचणीमध्ये सापडल्या आहेत किंवा या गोष्टीमुळे तुम्हाला काही अडचणी येत आहेत,लैंगिक छळ होत आहे, तर होणारा त्रास पोलिसांना,घरच्यांना किंवा आईवडील यांना ठामपणे सांगता आला पाहिजे.
जेणे करून वेळेत त्यावर कारवाई करता येईल व भविष्यातील होणारा एखादा गंभीर गुन्हा थांबवता येवू शकेल.
प्रत्येक घरातील मुलगीही त्या कुटुंबाची इज्जत असते. ती विवाहानंतर माहेर व सासर चा आधारस्तंभ होऊ शकते.
स्वतःच्या कुटुंबाचा आधार बनू शकते व कुटुंब योग्य पद्धतीने सांभाळू शकते,त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला कमीपणा येईल, परिवाराचे आपल्या कुटुंबाचे आपल्या नातेवाईकांचे नाव समाजात खराब होईल असे न वागता आपल्याला मिळालेली नीतिमूल्ये,संस्कार जपायला हवीत असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मेरी कोम, धावपटू ललिता बाबर, कल्पना चावला या सर्वसामान्य कुटुंबातीलच आहेत त्यांनी आपापल्या क्षेत्रात नेत्रदीपक अशी उल्लेखनीय कामगिरी करून इतिहासात नाव अजरामर केले आहे.अशा व्यक्तीमत्वांना रोल मॉडेल मानून,तुमच्या आईवडील ,नातेवाईक, गुरुजन वर्ग यांना तुमचा अभिमान वाटेल अशीच प्रगती केली पाहिजे.असे मत सौ.सुप्रिया बर्गे यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त सौ राही रणसींग, प्राध्यापक गूळीक, तसेच वालचंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.रतीलाल चौधर साहेब, बारामती येथील फौजदारी कायद्यातील तज्ञ वकील श्री.विशाल बर्गे हे यावेळी हजर होते.
प्राध्यापक राम मोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर
मान्यवरांची ओळख प्राध्यापक प्राजक्ता सोनवणे यांनी करून दिली.
तसेच नम्रता सपकाळ यांनी आभार मानले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा