
बारामती : जेजुरी ता.पुरंदर येथील बजंरग हनुमंत पवार रा.पवारवाडी जेजुरी ता.पुरंदर जि.पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पवार हे शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोरगाव चौक, जेजुरी,तालुका पुरंदर येथून आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना हर्षल गरूड व त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीने पवार यांच्या मोटारसायकलला त्यांची मोटारसायकल आडवी लावली व गाडीची चावी काढुन घेतली.

त्यावेळी पवार यांनी त्यास तु माझ्या गाडीची चावी का काढुन घेतली? व तु मला कशासाठी थांबवले असे विचारला असता, थांब जरा, इथे ओंकार भाऊ येतोय असा बोलला. त्यावर पवार बोलले मला इथं थांबायचे नाही.याच दरम्यान एक पांढऱ्या रंगाची फॉरच्युनर गाडी आली,त्यामध्ये तीन लोकं बसलेली होती.त्यापैकी पवार यांच्या ओळखीचा ओंकार नारायण जाधव हा होता.त्यांनी पवार यांना जबरदस्तीने गाडीत ढकलुन आत बसवले व मावडी पिंपरी गावच्या हदीत एका शेतात नेले तेथे गाडीत असतानाच ओंकार जाधव हा “तुला कसला माज आलाय, तु बोलवुन पण येत नाही, तु का भेटायला येत नाही.” असे बोलला.

मी नोकरीला आहे मी बाहेर असतो,त्यामुळे मला येता येत नाही असे त्यांनी सांगितले. दरम्यान ओंकार नारायण जाधव याने बाकीच्या लोकांना गाडीतुन खाली उतरविले. व ओंकार जाधव व हर्शल गरूड हे दोघेच गाडीमध्ये सोबत बसले असताना ओंकार नारायण जाधव याने माझे डोक्याला रिवॉल्वर लावला व मला म्हणाला की, तु जेजुरी एम.आय.डी.सी मधील कंपन्यांचे वेस्टेज मटेरीयल घेतो त्यामुळे तु आठ दिवसात मला पाच लाख रूपये आणुन द्यायचे,नाहीतर गौतमचे जे केलं तसं तुझेपण होईल, मग बघ तुला काय करायचे ते असे म्हणाला त्याचवेळी हर्षल गरूड हा म्हणाला की तु प्रत्येक महीन्याला ओंकार भाऊला पन्नास हजार रूपये आणुन द्यायचे.याचवेळी ओंकार जाधव याने पवार यांना गाडीतुन उतरून बाजुला नेले. व मला म्हणाला की, हे बघ, मला एवढी पोरं संभाळावी लागतात, ती काय बारीक पोरं नाहीत,कमरेला घोडे लावुन फिरणारी पोरं आहेत,

तुला मारायला काय जास्त वेळ लागणार नाही,जरा मी सांगितलेले ऐकत जा,असे बोलून व शिवीगाळ करत दमदाटी केली. व आठ दिवसात मी सांगितलेले काम झाले पाहीजे अशी धमकी दिली.
त्यांनतर त्यांनी पवार यांना पुन्हा गाडीत बसविले व मोरगाव चौक येथे मोटारसायकल जवळ आणुन सोडले व निघुन गेले.
म्हणुन पवार यांनी ओंकार नारायण जाधव रा.जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे व हर्षल गरूड रा. बेलसर ता. पुरंदर व त्यांचे इतर साथीदार यांचे विरूध्द कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने जेजुरी पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३०८(२)१३७(२)१४० (२) ३५२,३५१,१८९(२) १९१ (२) शस्त्र प्रतिबंधक कायदा ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेजुरी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे पुढील तपास करीत आहेत.
घटनेतील सर्व आरोपी फरार असून पोलीसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपींवर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे आरोपींवर अशा प्रकारचे गंभीर स्वरूपातील पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
असे असूनही पोलीस प्रशासनाकडून आत्तापर्यंत त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही.असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोपीस राजकीय पाठबळ असल्यामुळे कारवाई होत नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा