गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
माळेगाव पोलिसांची मोठी कामगिरी; ४ लाख ११ हजारांचे १८ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत

0
6
0
7
6
1
माळेगाव बुद्रुक (बारामती): पुणे ग्रामीण पोलीस दलातील माळेगाव पोलीस ठाण्याने एक कौतुकास्पद कामगिरी केली असून, नागरिकांचे हरवलेले एकूण १८ मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत ४ लाख ११ हजार रुपये इतकी आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गोपनीय शाखेचे पोलीस नाईक श्री. ज्ञानेश्वर सानप यांची नियुक्ती केली होती. सानप यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास करून हे मोबाईल शोधून काढले.

शोधण्यात आलेल्या मोबाईलमध्ये १ लाख १६ हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलॅक्सी अल्ट्रा २३ या महागड्या फोनसह विवो, ओप्पो, मोटोरोला आणि रेडमी यांसारख्या विविध कंपन्यांच्या संचांचा समावेश आहे. बारामती तालुका, सांगवी, माळेगाव बुद्रुक, फुरसुंगी, पिंपरी चिंचवड अशा विविध भागांतील नागरिकांना त्यांचे हरवलेले फोन परत मिळाले आहेत.

शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार निवारण दिनाचे औचित्य साधून हे मोबाईल वितरीत करण्यात आले.

विशेष म्हणजे, माळेगाव पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी विशेष परिश्रम घेत आतापर्यंत १०७ हरवलेले मोबाईल शोधले आहेत. ज्याची एकूण बाजारपेठ किंमत २० लाख २२ हजार रुपये इतकी आहे.



