Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात, नऊ जण ठार, पाचजण गंभीर जखमी 

0 6 8 5 4 8

बारामती : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर बुधवारी 18 जून 2025 रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, त्यात दोन मुलांसह पाच जण गंभीर जखमी असल्याचे समजत आहे. हा अपघात किर्लोस्कर कंपनीसमोर, श्रीराम हॉटेलजवळ घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने क्रमांक एम एच 42 ए एक्स 1060 ने श्रीराम हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या एका पीकअप टेम्पोला क्रमांक एम एच 12 एक्स एम 36 94 ला जोरदार धडक दिली.पीकअपमधून हॉटेलचे साहित्य उतरवण्याचे काम सुरु असतानाच हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे.

या अपघातात पीकअपमधून साहित्य खाली उतरवणारे काही कामगार, हॉटेलचे मालक तसेच कारमधील काही व्यक्ती आणि एका महिलेसह असे एकूण आठ जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

जखमींमध्ये दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार  उपचारा दरम्यान एका सहा वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळात आहे.

अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तसेच मृत व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले.

हा भीषण अपघात मन सुन्न करणारा आहे, अशा प्रत्यक्षदर्शींनीनी भावना व्यक्त केल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे