आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
स्वातंत्र्य विद्यामंदिर प्रशालेने राबविला ग्राम स्वच्छता उपक्रम, पालखी मार्ग व पालखी विसावा ठिकाणाची स्वच्छता

0
6
3
3
2
0
बारामती: शुक्रवार दिनांक 27 जून रोजी श्री संत श्रेष्ठ सोपानकाका महाराजांच्या पालखीचे वडगाव निंबाळकर स्वागत करण्यात आले पालखी गावातून जात असताना गावातील अनेक सामाजिक संस्थांच्यावतीने वारकऱ्यांना पाणी बाॅटल, नाष्टा, बिस्किटे, असे अल्पोपहार व जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान स्वातंत्र्य विद्यामंदिर प्रशालेनेही वारकऱ्यांना दुपारी प्रशालेत विसाव्यासाठी शाळा उपलब्ध करून दिली होती.यानंतर पालखी पुढील गावात प्रस्थान झाल्यानंतर गावातील विविध ठिकाणी पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा पालखी मार्गावर पडलेला होता.

हा कचरा एकत्र करून पालखी मार्ग स्वच्छ करण्यासाठी व शिक्षणाबरोबरच ग्राम स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी शनिवार दिनांक 28 रोजी स्वातंत्र्य विद्या मंदिर प्रशालेने विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रम राबविला.

निरा बारामती रोडवर विद्यमान उपसरपंच सौ.संगीताताई शहा यांच्या फार्म पासून वडगांव एसटी स्टँड पर्यंत स्वच्छता मोहीम राबवली, याचबरोबर सावतामाळी मंदीराचा परिसरही स्वच्छ करण्यात आला.

या उपक्रमामध्ये वडगाव निंबाळकर गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री सुनील ढोले, प्रगतिशील बागायतदार तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू शेठ शहा, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री.विजयराव हिरवे,

शाळा व्यवस्थापन समिती, प्रशालेचे प्राचार्य श्री.हेमंत तांबे सर,पर्यवेक्षक श्री.हेमंत बगनर सर , ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांनी कचरा गाडी,मास्क,हॅन्डग्लोज उपलब्ध करून दिले. कचरा एकत्रितपणे गोळा करत असताना कचरा गाडी सोबत असल्याने विद्यार्थ्यांचे काम हलके झाले. सर्व विद्यार्थी व उपस्थित ग्रामस्थांनी परिसर अतिशय सुंदररित्या स्वच्छ केला.
स्वच्छता मोहीम चांगल्या पद्धतीने राबवल्याबद्दल सर्व शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना खावू वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व समजले. आपल्या परिसरा सोबतच गावातील सार्वजनिक स्वच्छता किती महत्त्वाची आहे त्यामुळे आपला गाव, आपला परिसर, स्वच्छ व निरोगी राहण्यास मदत होते व ते सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे आहे हा संदेश या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाला.
गावातील सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.






