ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
शरद पवारांचे राहुरी फॅक्टरीत स्वागत स्व. बाबुराव दादा तनपुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त केले अभिवादन

0
5
8
4
3
4
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज श्रीरामपूर येथे नियोजित कार्यक्रमास जात असताना राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

माजी आ.प्राजक्त तनपुरे हे काल राष्ट्रावादीच्या वर्धापन दिनास गैरहजर राहिल्याने त्यांच्या बाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना आज मात्र माजी आ.तनपुरे शरद पवार यांच्या गाडीत प्रवास, पवारांच्या राहुरीतील भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होत आहे.

श्रीरामपुर येथील नियोजित कार्यक्रमानिमित्त नगरहून श्रीरामपूरकडे जात असताना आज माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी राहुरी फॅक्टरी येथील श्री.विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालय येथे डॉ.बाबुराव दादा तनपुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

यावेळी अहिल्यानगरचे खा.निलेश लंके, माजीमंत्री प्राजक्त तनपुरे, डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे , हर्ष तनपुरे , रावसाहेब चाचा तनपुरे, डॉक्टर जयंत कुलकर्णी,साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, माजी उपनगराध्यक्ष आण्णासाहेब चोथे, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर कदम, व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज,आदिनाथ कराळे, नंदकुमार तनपुरे, विजय डौले, कृष्णा मुसमाडे, ज्ञानेश्वर कोळसे,दत्तात्रय कवाणे, अरुण ढुस,महेश उदावंत,संतोष आघाव, विश्वास पाटील, ज्ञानेश्वर वाणी, ज्ञानेश्वर कोळसे,सुयोग नालकर, डॉ. अनंतकुमार शेकोकार, डॉ. भागवत वीर, डॉ.मच्छिंद्र गागरे आदींसह डॉक्टर तनपुरे कारखान्याचे सर्व संचालक, बाजार समितीचे संचालक व विवेकानंद नर्सिंग होमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




