गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
देवळाली प्रवरा येथील एसबीआय बॅकेच्या एटीएमवर दरोडा.

0
7
2
9
0
4
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी : देवळाली प्रवरा येथिल पोलिस चौकी कायमच बंद रात्रीची गस्तही अनेक वर्षा पासून बंद देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसा पासून घरफोड्या व चोऱ्यांचे सत्र थांबता थांबेना तरी पोलिसांची मात्र अद्यापही गस्त सुरु केलेली नसल्याने पोलिस साखर झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एसीबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून रोख रक्कम लंपास करुन दरोडा घातला आहे.एटीएमवर दरोडा घालण्याची घटना घडल्यानंतरही देवळाली प्रवराची चौकी बंदच होती.बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत राहुरी फॅक्टरी सह देवळाली प्रवरा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नुकतेच आठ दिवसापूर्वी येथील चार बंगले चोरट्यांनी फोडले त्याचबरोबर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली तर मागील दोन दिवसापूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. दरम्यान बुधवारी सकाळी देवळाली प्रवरा शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठी रक्कम लंपास केली आहे. किती रक्कम गेली याबाबत मात्र अधिकृत माहिती समजू शकली नाही.देवळाली प्रवरात स्वतंत्र पोलिस चौकी आहे.परंतू पोलिस चौकीत नेमणूकीस असलेले पोलिस पोलिस चौकी उघडण्यासही येत नाही.पोलिस स्वतःच्या घरी साखर झोपेत असताना एसबीआय बँकेचे एटीएमवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला.दरोडा टाकणारे अज्ञात दरोडे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले.दरोडेखोर पांढऱ्या रंगाच्या बोलोरो गाडीतून आले होते.पोलिस त्या गाडीचा सीसीटिव्हीच्या माध्यमातून गाडीचा नंबरचा शोध घेत आहे.ठसेतज्ञ साहय्यक पोलिस निरीक्षक गणेश वंडागेकर,हे.काँ.शाहिन पठाण, पो.काँ. मुरलीधर खरपूडे,फॉरेसिनिकचे गणपत झरेकर,सोहेल सय्यद ठेसे घेण्यासाठी आले असता एसबीआय बँकेचे एटीएममध्ये पाचशे व शंभरच्या नोटा सापडल्या एटीएम मधील पैशाचे सर्वच बाँक्स दरोडेखोरांनी नेले आहेत.

घटनेची माहिती समजतात राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव,संदिप मुरकूटे,सूरज गायकवाड, गणेश लिपणे,प्रमोद ढाकणे,सतिष कुऱ्हाडे, तसेच एलसीबीचे अतुल लोटके, रमिराजा आत्तार, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, महादेव भांड यांनी धाव घेतली आहे




