अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
वरीष्ठांच्याकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने श्री.दिपक जनार्दन वाघ एकदिवसीय लक्षवेधी (लाक्षणिक) उपोषण करणार

0
6
1
9
8
2
बारामती: होळ ग्रामपंचायतची ग्रामसभा व मासिक सभाघेतल्या जात नसल्याने सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे विरुद्ध वरीष्ठांच्याकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने श्री.दिपक जनार्दन वाघ सदस्य,ग्रामपंचायत होळ हे शुक्रवार दिनांक ११/०७/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय होळ येथे एकदिवसीय लक्षवेधी (लाक्षणिक) उपोषण करणार असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

श्री.दिपक वाघ यांनी दिनांक ०४/०७/२०२५ रोजी बारामती गटविकास अधिकारी,पंचायत समिती बारामती यांना सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई होताना दिसत नाही व आपण त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला आहे. व त्याच कारणाने श्री.वाघ व समस्त होळ ग्रामस्थ दिनांक ११/०७/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय होळ समोर एकदिवसीय लाक्षणिक (लक्षवेधी) उपोषणास बसणार असल्याचे एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
त्यांनी वरील विषयाबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. पुणे तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे यांनाही आपल्या उपोषणाबाबत निवेदनाद्वारे कळविले आहे.




