ब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
बारामती शहर पोलिसांची मोठी कामगिरी: गहाळ झालेले ४ लाखांचे २७ मोबाईल हस्तगत; मूळ मालकांना संपर्क साधण्याचे आवाहन

0
7
7
9
0
7
बारामती: बारामती शहर आणि परिसरातील सार्वजनिक ठिकाणे व बाजारातून गहाळ झालेले मोबाईल शोधण्यात बारामती शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तब्बल ४,०५,०००/- रुपये किमतीचे एकूण २७ मोबाईल हस्तगत केले आहेत. हे मोबाईल महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतून शोधून काढण्यात आले असून ते मूळ मालकांना परत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) श्री. गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला गहाळ मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, पोलीस अंमलदार अभिजित कांबळे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, सागर जामदार, अक्षय सिताप, विशाल शिंदे, गिरीष नेवसे, विशाल चौधर, पोपट कवितके, वैभव मदने आणि अमोल देवकाते यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
शहर पोलीसांचे नागरिकांना आवाहन:
हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात येणार आहेत. तरी खालील यादीतील नागरिकांनी बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सागर जामदार यांच्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.
मोबाईल सापडलेल्या मूळ मालकांची नावे:
१. सतिश दत्तात्रय झगडे (रा. बारामती)
२. अमोल भगवान साळवे (रा. आमराई, बारामती)
३. नंदकुमार उत्तम साठे (रा. देवळेपार्क, बारामती)
४. ऋतुजा सतिश भुजबळ (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती)
५. संदीप दत्तात्रय बनसोडे (रा. काझड, ता. इंदापूर)
६. संदीप भारती (रा. बारामती)
७. दादासाहेब पवार (रा. अहमदनगर)
८. अविनाश लोंढे (रा. बारामती)
९. उमेश दानोळे (रा. गुणवडी रोड, बारामती)
१०. गणेश नंदकुमार दंडाले (रा. शेवाळवाडी, पुणे)
११. शिरीन बागवान (रा. कसबा, बारामती)
१२. विकास हनुमंत सावंत (रा. कुरवली, ता. इंदापूर)
१३. विनोदकुमार अरविंद साळुंखे (रा. कसबा, बारामती)
१४. ऋतुजा बापुराव शिंगाडे (रा. सूर्यनगरी, बारामती)
१५. दिपक मोरे (रा. मळद, ता. बारामती)
१६. लक्ष्मी बबन आगम (रा. शारदानगर, बारामती)
१७. सोनाली सुर्यकांत माने (रा. गुळुकरवस्ती, फलटण रोड, बारामती)
१८. विनोद शिंदे (रा. अंथुर्णे, इंदापूर)
१९. सोनाली राहुल तांबे (रा. विजयनगर, बारामती)
२०. हनुमंत पिलोवा सावंत (रा. मेखळी, ता. बारामती)
२१. स्मीता गणेश कवडे (रा. बारामती)
२२. अशितोष नानासाहेब सलगर (रा. बारामती, पुणे)
२३. अश्विन महादेव कांबळे (रा. मळद, ता. बारामती)
२४. अंजिक्य प्रकाश कांबळे (रा. खांडज, ता. बारामती)
२५. रंजना चकनारायण (रा. बारामती)
२६. विवेक गोकुळ टांकसाळे (रा. काटेवाडी, ता. बारामती)
२७. महादेव बलभिम सावंत (रा. बेलवाडी, ता. इंदापूर)
टीप: वरील यादीतील संबंधितांनी आपली ओळख पटवून मोबाईल ताब्यात घ्यावेत.







