गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
अल्पवयीन मुलीवर दोघांचा तीन वेळा अत्याचार,- वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

0
6
0
2
6
3
बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित करंजे पूल दुरक्षेत्राच्या हद्दीत एका अल्पवयीन पीडीतेवर दोन नराधमांनी तीन वेळा अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 01/06/2025 रोजी दुपारी 02:30 वा.चे सुमारास अल्पवयीन पिडितेला दादा वायकर रा.करंजेपुल ता.बारामती जि.पुणे याने त्याचा मित्र सनी यादव रा.वाघळवाडी ता.बारामती यांच्या घरी बोलावून घेतले व तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले व तु हा प्रकार कोणास सांगु नको जर सांगितला मी तुझे वाटोळे करेन तुझे लग्न होवु देणार नाही.तसेच तु जर हा प्रकार पोलीसांना सांगितला तर मी जेलमधुन सुटल्यावर तुला व तुझ्या घरातील एकालाही जीवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली.

याआगोदरही दादा वायकर रा.करंजेपुल ता.बारामती याने पिडीतेच्या वाढदिवसाच्या दिवशी तीला फोन करून तुला वाढदिवसाचे गिफ्ट दयायचे आहे असे सांगुन बोलावुन घेतले व अंधाराचा फायदा घेत वाढदिवसाच्या दिवशी तेथेच जबरदस्तीने जवळ असलेल्या शेतातातील विहिरीजवळ बांधलेल्या रुममध्ये नेवुन पिडीतेच्या अंगाशी जबरदस्तीने लगट करुन बळजबरीने शारीरीक संबंध ठेवलेले आहेत. आणि तु जर कोणाला सांगितले तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली होती,





