Breaking
अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बारामतीत अवैध धंद्यांना पोलिसांचे संरक्षण? – वंचित बहुजन युवा आघाडीचा संतप्त सवाल

0 7 3 8 3 6

बारामती : बारामती शहर व तालुक्यातील अनेक लॉजमध्ये सुरू असलेल्या अवैध व बेकायदेशीर वेश्या व्यवसायाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने 28 जुलै रोजी निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली होती. परंतु धक्कादायक म्हणजे आजतागायत कोणतीही ठोस कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली दिसत नाही.

जिल्हाध्यक्ष मंगलदास तुकाराम निकाळजे यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले होते की

बारामतीतील सर्व लॉजची तात्काळ तपासणी करावी.

संबंधित लॉज मालक व व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करावेत.

अल्पवयीन मुलींचा गैरवापर होत असल्यास POCSO कायद्यान्वये गुन्हे नोंदवावेत.

पोलिस प्रशासनातील दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी.

ज्या लॉजमध्ये असे प्रकार सुरू आहेत त्यांचे परवाना रद्द करावेत.

निवेदनात पुढे स्पष्टपणे नमूद केले होते की, शहरातील प्रमुख रस्त्यांलगत, एमआयडीसी परिसरात आणि शहराबाहेरील लॉजमध्ये अल्पवयीन मुली, परराज्यातील महिला यांचा वापर करून वेश्या व्यवसाय फोफावला आहे. यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून गुन्हेगारी वाढीस लागली आहे.

पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद?

या गंभीर तक्रारीनंतरही कारवाई न होणे हे चिंताजनक आहे. यावरून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

 “कायद्याचे पालन करण्याऐवजी पोलिसांकडून अवैध धंद्यांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत आहे का?” 

असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीने उपस्थित केला आहे.

‘जनतेचा आक्रोश :  त्वरित कारवाई करा’

संस्थेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर संबंधित लॉजेस व अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी आणून दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर जनआंदोलन छेडण्यास भाग पाडले जाईल.

जनतेची सुरक्षितता व सामाजिक वातावरणाची शुचिता टिकवण्यासाठी ही कारवाई तातडीने होणे अत्यावश्यक असल्याचे निकाळजे यांनी ठणकावून सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे