Breaking
अपघातब्रेकिंगमहाराष्ट्र

हायवाचा धक्का मृत्यू पक्का !  बारामती शहरात भीषण अपघात, एकाचा जागीच तर इतरांचा उपचारादरम्यान मृत्यू 

0 6 0 7 7 7

बारामती: दि. 27/07/2025 रोजी सकाळी 11 ते 11.30 वाजेचे दरम्यान बारामती शहरातील महात्मा फुले चौक, खंडोबानगर येथे एका हायवा (डंपर) चालकाने रस्त्यावरील वाहतुकीकडे दुर्लक्ष करुन व अविचाराने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन आपले वाहन भरधाव वेगात चालवुन तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याची दुर्दैवी व हृदयद्रावक घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार राजेंद्र आचार्य वय 37 ,सई ओंकार आचार्य वय 10 व मधुरा ओंकार आचार्य वय 4 हे सर्वजण दुचाकीवरून आपल्या घरी येत असताना बारामती शहरातील महात्मा फुले चौक खंडोबा नगर येथील वळणावर दशरथ दत्तात्रय डोळे रा. भिलारवाडी ता करमाळा जि सोलापुर याने स्वतःच्या ताब्यातील डंपरने मोटार सायकलला ओव्हरटेक करताना हायवा (डंपर) च्या पाठीमागील चाकाची धडक दिली व यात ओंकार राजेंद्र आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला तर 

सई ओंकार आचार्य, व मधुरा ओंकार आचार्य यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेस हायवा डंपर चालक कारणीभूत असल्याने हायवा डंपर क्रमांक MH 16 CA 0212 वरील चालक दशरथ दत्तात्रय डोळे रा. भिलारवाडी ता करमाळा जि. सोलापुर याच्या विरोधात अमोल राजेंद्र आचार्य (मयत ओंकार राजेंद्र आचार्य याचे भाऊ) रा.खंडोबानगर बारामती यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्री.अनिल सातपुते हे करीत आहेत.

घडलेल्या घटनेचा मानसिक धक्का बसुन नुकतेच दवाखान्यातून घरी आलेले ओंकार आचार्य यांचे वडील राजेंद्र आचार्य यांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

एकंदरीत एकाच दिवसात एकाच कुटुंबातील चार जण मृत्यू पावल्याने संपूर्ण शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

कारवाई होणार का ?

बारामती शहर तसेच तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्यांची पुलांची कामे सुरू आहे त्या अनुषंगाने हायवा डंपर सारखी वाहने, तसेच रस्त्यावर नियमितपणे खडी,मुरूम वाहतूक करणारी वाहने रस्त्याने बेदरकारपणे, बेभानपणे,वाहतूक करत असतात.

अशी वाहने बहुतेक मोठमोठ्या कंत्राटदारांची असल्याने अपघात झाल्यानंतर काही होत नाही,आपण पाहून घेऊ अशा अविर्भावात हे मालक लोक आहेत.

अशा वाहनांवर व त्या मालकांवर कारवाई कोण करणार? असा प्रश्न या निमित्ताने उभा आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे