Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी

गहाळ झालेले एक तोळा सोन्याचे दागिने दोन तासात मुळ मालकास परत, सुपा पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

0 6 2 9 0 5

बारामती : संदीप संभाजी वानखेडे राहणार विरार, मुबंई हे देवदर्शनास जेजुरी येथे आले होते. ते जेजुरी येथून मोरगाव येथे येत असताना जेजुरी ते मोरगाव रोडलगत आंबी पाटी येथील हॉटेल श्रृष्टि येथे जेवण करण्यास थांबले होते.त्यांनी त्यांच्या हातातील प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या एकूण १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या हॉटेल सृष्टी येथील वॉश बेसिन जवळ काढून ठेवल्या व त्या तेथेच विसरल्याने तेथून गहाळ झाल्या होत्या.

त्याबाबत त्यांनी दिनांक 14 जून 2025 रोजी सुपा पोलीस ठाणे येऊन माहिती दिली होती. 

सुपा पोलीसांनी तक्रार दाखल करुन घेऊन ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अंमलदार किसन ताडगे व महादेव साळुंखे यांना सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी योग्य त्या सूचना देऊन तक्रारदार यांच्या सोन्याच्या अंगठ्याचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या पोलिस अंमलदार किसन ताडगे व महादेव साळुंखे यांनी तातडीने हॉटेल सृष्टी व मोरगाव येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच तक्रारदार यांच्याकडून अधिकची माहिती घेऊन त्या माहितीच्या आधारे संशयित तवेरा गाडी नं MH 14 AM 3332 निष्पन्न करून गाडी मालकास संपर्क साधला व त्यांना सुपा पोलीस स्टेशन येथे बोलावून घेऊन चौकशी केली. त्यावेळी गाडीत असणाऱ्या महिलेकडे विचारणा केली असता त्यांनी हॉटेल सृष्टी येथील वॉश बेसिन वर दोन अंगठ्या सापडल्या असल्याचे सांगितले. सदरच्या गहाळ झालेल्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या हस्तगत करून तक्रारदार संदीप संभाजी वानखेडे राहणार विरार,मुबंई यांना सुपा पोलीस ठाणे येथे परत करण्यात आल्या.

सुपा पोलिसांनी घटनेचा तत्परतेने तपास करून आपले गहाळ ऐवज परत मिळवून दिले त्याबद्दल संदिप वानखेडे यांनी समाधान व्यक्त करीत पोलीसांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे