गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
बाजरीच्या शेतात सापडला मृतदेह, जेजुरी पोलीसांनी 24 तासात उलघडला खुन

0
6
2
9
0
5
बारामती: दिनांक 01/8/2025 रोजी सकाळच्या सुमारास ज्ञानदेव लक्ष्मण भागे वय 82 वर्षे रा मावडी.क.प ता.पुरंदर जि.पुणे याचे मयत मावडी क.प ता. पुरंदर जि.पुणे गावाच्या हदीत एका शेतात बाजरीच्या पिकात मिळुन आले असल्याबाबत मयताच्या नातेवाईकांनी खबर दिलेली होती.त्यावरून जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून रजिस्टरी नोंद करण्यात आली होती.
दाखल प्रकरणाच्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांना एका गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, ज्ञानदेव लक्ष्मण भामे यांचा व त्याचा सख्खा लहान भाऊ,चांगदेव लक्ष्मण भागे यांच्यात जमीनीतील रस्त्यावरून वाद होता.त्या अनुषंगाने पोलीसांनी तात्काळ चांगदेव लक्ष्मण भामे यास तपासासाठी ताब्यात घेतले व चौकशी केली.

चौकशी दरम्यान त्यांने झाल्या प्रकाराबाबत सांगण्यास नकार दिला,परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांने त्याचा सख्खा मोठा भाऊ ज्ञानदेव लक्ष्मण भामे याने शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता आडवीत असल्याने व त्रास देत असल्याने त्याला हाताने,लाथा बुक्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यामध्ये ज्ञानदेव लक्ष्मण भागे यांच्या डोक्यास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे सांगितले.
याच दरम्यान वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रूग्णालय जेजुरी यांनी देखील पोस्ट मार्टेम अहवालात मयताच्या डोक्यास गंभीर जखम झाल्याचे सांगितले.
त्यावरून ज्ञानदेव लक्ष्मण भामे याचा त्याचा सख्खा लहान भाऊ चांगदेव लक्ष्मण भामे यांनेच जमीनीच्या रस्त्याच्या वादाच्या कारणावरून खुन केल्याचे उघड झाले असुन आरोपी चांगदेव लक्ष्मण भामे यास सदर गुन्हयाच्या कामी दिनांक 2/8/2025 रोजी रात्री अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई श्री.संदीपसिह गिल, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री. गणेश बिराजदार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग बारामती, श्री.तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड, याचे मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक,श्री.दिपक वाकचौरे,पोलीस उपनिरीक्षक,श्री महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक,श्री नामदेव तारडे, पोलीस उपनिरीक्षक,श्री सर्जेराव पुजारी श्री. दशरथ बनसोडे पो.हवा,श्री. विठठल कदम,मुनीर मुजावर,श्री.संदीप भापकर,पोलीस कॉन्स्टेबल श्री हेंमत भोंगळे यांच्या पथकाने केली,
या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.महेश पाटील हे करीत आहे.





