ब्रेकिंगमहाराष्ट्र
पुण्यातील नवीन सात पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या.

0
5
5
5
3
6
पुणे : पुणे शहराचा वाढता विस्तार पाहता गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने शहरात नवीन पोलीस ठाणे तसेच मनुष्यबळ उपलब्ध करून मिळावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याचा पाठपुरावा करण्यात आला होता. गृहविभागाने यावर निर्णय घेत पुणे पोलीस आयुक्तालयात सात नवीन पोलीस ठाणी सुरु करण्यास मंजुरी दिली, तसेच पोलीस ठाण्यात काम करण्यासाठी ८२६ पोलीस कर्मचारी उपलब्ध करून दिले. पोलीस ठाण्यांच्या इमारत उभारणीसाठी ६० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.सात नवीन पोलीस ठाण्यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते.

त्यानुसार आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलीस ठाणे सुरू झाली आहेत. पोलीस ठाण्यांसाठी जागाही निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
नव्याने सुरू झालेल्या सात पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच दिले.
आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे – शरद झिने, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंबेगाव पोलीस ठाणे), अतुल भोस, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेड सिटी), महेश बोळकोटगी, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणेर पोलीस ठाणे), विजयानंद पाटील, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतु:शृंगी पोलीस ठाणे), संजय चव्हाण, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाणे), अनिल माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणे), पंडीत रेजीतवाड, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे), सर्जेराव कुंभार, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस ठाणे), मंगल मोढवे , (वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी पोलीस ठाणे), शंकर साळुंखे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे), मानसिंग पाटील, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे)





