अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी रोहन शिंदे, तर उपाध्यक्षपदी अजित यादव यांची बिनविरोध निवड

0
5
5
5
4
0
बारामती : तालुका नाभिक संघटनेच्या कार्यकारिणीची निवड काल दि.२९ मंगळवार रोजी अत्यंत उत्साही व सलोख्याच्या वातावरणात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत श्रेष्ठ सेना महाराज तसेच शूरवीर जिवाजी महाले नरवीर शिवाजी काशीद त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व अभिवादन करून झाली. त्यानंतर समाजातील ज्वलंत प्रश्नांवर व संघटनेच्या आगामी योजना, कार्यपद्धती यावर खुले संवाद,चर्चा आणि मंथन करण्यात आले.
दरम्यान या निवडीत रोहन शहाजी शिंदे यांची अध्यक्षपदी, तर अजित सुभाष यादव यांची उपाध्यक्षपदी एकमताने आणि बिनविरोध निवड करण्यात आली.

कार्यकारिणी खालीलप्रमाणे
अध्यक्ष – रोहन शहाजी शिंदे
उपाध्यक्ष – अजित सुभाष यादव
कार्याध्यक्ष – अनंत आपुणे
खजिनदार – शिरीष काशीद
सचिव – आदेश संजय आपुणे
सहसचिव – ओंकार शिंदे
सदस्य नियुक्ती
अमोल रवींद्र सूर्यवंशी, अभय सतीश सूर्यवंशी, नवनाथ सुरेश सूर्यवंशी, शुभम राजेंद्र माने, आकाश संजय आपुणे, शंभू किशोर शिंदे, रोनक किरण शिंदे, सुरज सुनील वारुळे, मारुती दुधाळ, संतोष काशीद, संतोष पवार, सागर माने प्रसिद्धी प्रमुख – संतोष शिंदे (भावनगरी संपादक) कायदेशीर सल्लागार – ॲड. प्रकाश बबनराव जाधव
या वेळी मावळत्या अध्यक्ष व कार्यकारिणीचा यथोचित सत्कार करण्यात आला. नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन खजिनदार शिरीष काशीद यांनी मानले.
मावळत्या अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी जिथे गरज भासेल, तिथे आम्ही नव्या कार्यकारिणीच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. संघटनातील सर्व माजी पदाधिकारी आणि समाजबांधव नव्या नेतृत्वास संपूर्ण सहकार्य करतील.
नवीन कार्यकारिणीकडून नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी सक्रिय, पारदर्शक व विधायक कार्य होईल,असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष रोहन शिंदे यांनी सांगितले समाजातील आज सर्व व्यावसायिक नाभिक समाज बांधव पदाधिकारी तथा माजी कार्यकारी संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते .सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष सुधाकर माने होते.
आजची सर्वसाधारण सभा हि पदाधिकारी निवड व श्री संतश्रेष्ठ श्री संतसेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम साजरी करण्यासाठी व त्याच दरम्यान सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती हि सभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.




