गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
“चोरी करून पळून चालली आरोपींची स्वारी,पोलीसांनी आणली ठाण्याच्या दारी”, माळेगांव पोलीसांची तत्पर कामगिरी

0
6
6
8
7
5
बारामती: माळेगांव पोलीस ठाणे हद्दीतील पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे येथील हॉटेल अमित चे मालक श्री.अमित उदयसिंह जगताप रा. नागेश्वरनगर, माळेगांव बु ता.बारामती हे दिनांक 15/08/2025 रोजी रात्री 11.00 वा.चे सुमारास हॉटेल बंद करून घरी गेले होते, दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक 16/08/2025 रोजी नेहमी प्रमाणे हॉटेल उघडण्याकरीता आले असता हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, निदर्शनात आलेल्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल मालक यांनी माळेगाव पोलीस ठाणे गाठले,सदर चोरी हि हॉटेल कामगार म्हणून काम करणारे सुरज रामनरेश वर्मा व विकास बाधम (पुर्ण नाव माहित नाही) दोघे रा.डंडनियापुरा ता.फातियाबाद जि.आग्रा,उत्तर प्रदेश यांनी केली असल्याचा त्यांना संशय आल्याने घडलेल्या घटनेविषयी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली,
हॉटेल मालक जगताप यांनी माळेगांव पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेनंतर माळेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक,सचिन लोखंडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने गुन्हे शोध पथकास पाचारण केले,आरोपी तसेच चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी गुन्हे शोध पथकास दिल्या, घटनेतील आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याने ते मूळगावी पळून जाण्याची शक्यता जास्त असल्याने माळेगांव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून आणि गुन्ह्याचे घटनास्थळाचे सी.सी.टी.व्ही च्या आधारे यातील आरोपी हे रेल्वेने दौंड येथून मनमाड येथे व तेथुन उत्तर प्रदेश येथे जात असल्याचे लक्षात आले माळेगांव पोलीसांनी मनमाड रेल्वे स्टेशन येथून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतला व सदर गुन्ह्यात आरोपींना अटक केली.

सदर चोरीच्या घटनेत आरोपींनी 40,000/- रू किंमतीची सुझुकी कंपनीची ॲक्सिस स्कुटी गाडी नं एम.एच 42 बी.सी 7806, 20,000/- रू किंमतीचे लॅपकेअर कंपनीचा कॅम्प्युटर व त्याचा सी.पी.ओ,किबोर्ड,10,000/- रू किमतीचा प्रिंटर,4000/- रू किमतीचा व्हर्लपुल कंपनीचा ओवन,4000/- रू किंमतीचा सुजाता कंपनीचा मिक्सर,8000/- रू किमतीचा स्टिलचा पिलर,3000/- रू किमतीचा एरटेल कंपनीचे वायफाय मशीन असा एकूण रक्कम 89000/ – रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे हॉटेल मालक जगताप यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले होते त्यानुसार माळेगाव पोलीसांनी पुर्ण मुद्देमाल जप्त केला आहे व दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

सदरची कामगिरी मा.श्री.संदीपसिंह गिल्ल,पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण, मा.श्री.गणेश बिरादार,अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.डॉ.श्री.सुदर्शन राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,सहाय्यक पोलीस निरीक्षक,सचिन लोखंडे तसेच पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मोरे,अमोल राऊत,अमोल कोकरे यांनी केली आहे.




