Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

राहुरी फॅक्टरी येथे राज रोजपणे अवैध दारू विक्री सुरू,दारुमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास पोलीस स्टेशनच्या आवारात अंत्यविधी करणार संतप्त महिलांचा पोलीसांना इशारा

0 5 5 5 4 1

अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी

राहुरी : तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राजरोसपणे अवैध दारु विक्री सुरु आहे. दारुचे व्यसन लागून परिसरातील अनेक तरुण कमी वयात मयत झाले आहेत. यापूढे दारुमुळे कोणी मयत झाले तर त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात करणार. असा सज्जड इशारा काही महिलांनी दिला.

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील काही महिला व पुरुषांनी आज दि. ३० जून २०२५ रोजी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले.

त्यात म्हटले आहे कि, प्रसाद नगर परिसरात राजरोसपणे दारु विक्री व्यवसाय चालू आहेत. सदर दारु विक्रेत्यांना परिसरातील नागरीकांनी भेटून व्यवसाय बंद करा, आमचे प्रपंच उद्वस्त होत आहेत. असे समजावून सांगीतले. परंतू ते कोणाचेही ऐकत नाही. आम्ही पोलिसांना हप्ते देतो, तूम्हाला आमचे काय वाकडे करायचे ते करुन घ्या. असे उत्तर दारु विक्रेत्यांकडून दिले जाते.

परिसरातील जिल्हा परिषद शाळा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हनुमान मंदिर परिसरात व्यवसाय चालतो. काही तरुण दारु पिवुन तेथे शिवीगाळ करुन धिंगाणा करतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तसेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना पैसे मागतात, पैसे न दिल्यास शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देतात. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड केली जाते. 

          सदर परिसरातील अवैध दारु व्यवसाय ताबडतोब बंद करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतीवेळी शरद साळवे, लैला शेख, परवीन शेख, रेखा जाधव, सुनिता पवार, रुथ कांबळे, मंगल थोरात, सविता बनसोडे, रोशन शेख, स्वार्थाबाई जाधव, जैतून भाभी, माया साठे, लता जगताप, अलका पठारे, लता साळवे, येलनबाई गायकवाड, परिगा सरोदे, अंजू बोर्डे, पल्लवी पवार, रंगूबाई मोकळ, लक्ष्मीबाई पंडित, कविता साळवे बबन निमसे नितीन पुंड सनि जगताप आदि महिला व पुरुष उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे