Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

Breaking news,फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एकाला अटक 

0 5 9 3 3 9

बारामती: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र  हादरला आहे, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली असताना आणि राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला असताना.व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणातील आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते यानंतर पोलीस कारवाईला वेग आला होता.

आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केल्याचे समजते आहे.या घटनेतील आरोपी प्रशांत किसन बनकर याला पुण्यातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रशांत बनकर हा त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता अशी माहिती समोर येत आहे.

 

अटक करण्यात आलेला आरोपी महिला डॉक्टर फलटणमध्ये ज्या घरात राहत होती त्या घरमालकाचा मुलगा आहे.गोपाल बदने या पोलिस उपनिरीक्षकासह प्रशांत बनकरने देखील या डॉक्टरला त्रास दिला होता. यांच्या त्रासालाच कंटाळून महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती असे आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर लिहून ठेवलेल्या नोट मध्ये उल्लेख आढळून आला होता. 

आत्महत्या प्रकरणात फलटण पोलिसांकडून पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या दोघांचाही पोलीस शोध घेत होते अखेर एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे तर बदने याच्या शोधात पोलीस पथके रवाना आहेत.

पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तळहातावरील सुसाईड नोट,कॉल रेकॉर्ड्स (CDR ) तसेच फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे चौकशीअंती या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून ठेवले आहे.

प्रशांत बनकरच्या अटकेनंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे तसेच यातील सत्य बाहेर येण्याची अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत.

या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी केलेली आहे.

या प्रकरणामुळे संपुर्ण राज्याचे राजकारण देखील तापले आहे. दरम्यान या प्रकरणात काही राजकीय नेत्यांवर देखील आरोप केले जात आहेत. या अटकेनंतर याबाबतही अधिकची माहिती समोर येण्यास मदत होईल. 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे