गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दीतील नागरिकांना आवाहन

0
5
4
4
3
5
बारामती : वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या दिवसा घरफोडी करून चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन काही ठिकाणी चोऱ्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.सचिन काळे यांनी हद्दीतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आपण काही कामानिमित्ताने घराबाहेर जाणार असाल किंवा पुढिल काही दिवस परगावी किंवा शेतीच्या कामानिमित्त घरापासून दूर जाणार असाल तर आपल्या घरातील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम अशा गोष्टी काळजीपूर्वक सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात व याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.
“सर्वांनी सतर्क व सुरक्षित राहावे तसेच आपल्या परिसरात कोणी संशयित अनोळखी व्यक्ती किंवा व्यक्ती समुह गावात फिरत असतील तर तत्काळ वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा”
अशी सुचना वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रभारी,सहायक पोलीस निरीक्षक,
श्री.सचिन काळे
वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे





