ब्रेकिंगमहाराष्ट्र
पुणे ग्रामीण पोलीस दलात फेरबदल, पुणे जिल्ह्यातील 15 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

0
6
0
7
7
4

बारामती : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत,
यामध्ये एका ठिकाणी 2 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या काल बुधवार दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आल्या आहेत.
यामध्ये पोलीस निरीक्षक व सहायक निरीक्षकांचाही समावेश आहे.या बदल्यांमध्ये काही सुमार कामगिरी असणाऱ्या अधिका-यांना पोलिस अधीक्षक यांनी दणका दिल्याचे समजते आहे.
या बदल्यांची रचना पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे त्यांचे नांव व कंसात त्यांचे बदली झालेले(नवीन)पोलीस ठाणे/विभाग दिले आहेत.
पोलीस निरीक्षक
(Police Inspectors)
सचिन दत्तात्रय वांगडे,
सध्या हवेली येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : उरुळी कांचन)
कुमार रामचंद्र कदम,
सध्या वडगांव मावळ येथे कार्यरत
(नवीन नेमणूक : सासवड)
रविंद्र दत्तात्रय पाटील,
सध्या कामशेत येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : नियंत्रण कक्ष)
अभिजित सुभाष देशमुख,
सध्या परकीय नागरिक नोंदणी कक्ष येथे कार्यरत. (नवीन नेमणूक : वडगाव मावळ पोलीस ठाणे)
वैशाली रावसाहेब पाटील,
सध्या बारामती ग्रामीण येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : हवेली)
शंकर मनोहर पाटील
सध्या उरुळी कांचन येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : कामशेत)
चंद्रशेखर मोहनराव यादव,
सध्या बारामती वाहतूक शाखा येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : बारामती तालुका पोलिस ठाणे पुणे ग्रामीण)
श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी,
सध्या नियंत्रण कक्ष येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : बारामती वाहतूक शाखा)
ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी,
सध्या सासवड येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : नियंत्रण कक्ष)
सहायक पोलीस निरीक्षक
(Assistant Police Inspectors)
महादेव चंद्रकांत शेलार, सध्या नारायणगाव येथे कार्यरत. (नवीन नेमणूक : स्थानिक गुन्हे शाखा)
नितीन हनुमंत खामगळ,
सध्या वेल्हा येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : नियंत्रण कक्ष)
प्रविण महादेव सपांगे,
सध्या यवत येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : नारायणगाव)
किशोर विठ्ठल शेवते,
सध्या वाचक,अपोअ कार्यालय पुणे येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : वेल्हा)
गजानन रतन चेके,
सध्या वाचक,उविपोअ बारामती येथे कार्यरत.
(नवीन नेमणूक : निरा नृसिंहपूर पोलीस ठाणे,नियोजित पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर)
बदलीचे आदेश प्राप्त होताच सर्व अधिका-यांनी बदलीच्या ठिकाणी त्वरित हजर होण्याचे आदेशही पोलिस अधीक्षकांनी दिलेले आहेत.






