गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
ताहाराबाद यात्रेत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, राहुरी पोलिसांची कारवाई

0
6
0
2
6
5
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी

राहुरी : पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 21/7/2025 पासून 24/7/2025 पर्यंत श्रेष्ठ संत महिपती महाराज यांची यात्रा सुरू होती.
या यात्रेदरम्यान भाविकांना दरोडा टाकून लुबाडण्याच्या उद्देशाने काही महिलांची व पुरुषांची टोळी यात्रेत आलेली आहे अशी गोपनीय माहिती दिनांक 23/7/2025 रोजी दुपारच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शासकीय पंचांसह छापा कारवाई केली असता,
1)संगीत सुभाष गायकवाड वय 45 वर्षे
2)परिगा नाना राखपसरे वय 60 वर्षे
3)सरस्वती दत्तू खंदारे वय 52 वर्षे
रा अशोकनगर श्रीरामपूर
4)मोनिका अशोक चव्हाण वय 19 वर्षे
5)सहारा प्रशांत चव्हाण वय 19 वर्षे
दोन्ही रा. भानस हिवरा ता. नेवासा
6)असलम अकबर शेख , वय 39 वर्ष
हे दरोडाच्या पूर्वतयारीने मिळून आल्याने त्यांच्यावर भारतीयांनी संहिता कलम ३१० अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना मा. न्यायालयाकडे हजर ठेवून त्यांची पोलीस कस्टडीची मागणी केली असता सरकारी अभियंता श्री गागरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडल्याने पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक,श्री सोमनाथ घाडगे अप्पर पोलीस अधीक्षक, श्री सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी,श्री बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलिस हवलदार विकास साळवे, विजय नवले ,जानकीराम खेमनर ,अशोक झिने,गणेश मैड , अंकुश भोसले ,नदीम शेख , इफ्तिकार सय्यद, महिला पोलीस शिपाई वंदना पवार ,मीना नाचन श्रीरामपूर आरसीबी पथक चे हवालदार सुनील वाघचौरे व आरसीपी पथक यांनी केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व इफ्तेकार सय्यद करत आहेत.





