अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव ता.बारामती शाळा व्यवस्थापन समितीची निवड संपन्न

0
6
0
2
5
8
बारामती : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ ता.बारामती येथील शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने व नविन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी दिनांक 09/10/2025 रोजी शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.पालकांच्यामधून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सदस्यांची निवड सर्वांच्या सहमतीने करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष म्हणून श्री.स्वप्निल शरदराव शिंदे, तर उपाध्यक्ष म्हणून दोन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये उपाध्यक्ष म्हणून श्री.अशोक उत्तम साळवे व सौ.दिपाली वैभव मदने यांची निवड करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री.राहुल राजकुमार जाधव यांची शिक्षणतज्ञ म्हणून निवड झाली.शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा आगम यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सोबत राहून शाळेचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे नूतन अध्यक्ष स्वप्निल शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष राहुल जाधव उपाध्यक्ष सुशीलकुमार अडागळे यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
मावळत्या कार्यकारिणीतील सदस्य समीर आतार मोहिनी दीक्षित, शुभांगी साळवे, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खोमणे,सूरज साळवे,कुलदिप जाधव,दत्तात्रय नेवसे,गणेश मोरे,मनिंदर खोमणे, पालक नागरिक व उपशिक्षिका शोभना घुले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.अरुणा आगम यांनी स्वागत केले तर उपशिक्षिका मालन बोडरे यांनी आणि अनिल गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
या सभेसाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते. सभेदरम्यान काही पालकांनी सूचना केल्या, मिळालेल्या सूचनांवर योग्य विचार करून संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवले जातील अशीही यावेळी चर्चा करण्यात आली.




