गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
गौरी स्थापनेचे फोटो समाज माध्यमावर शेअर करताय सावधान!

0
5
5
5
3
9
बारामती: सध्या गणेशोत्सव सुरू आहे व त्यात गौरीचे आगमन झाले आहे घरोघरी गौरीची सजावट तसेच गौरींना सोन्याचे दागदागिने घातले जातात व त्यांचे फोटो व्हिडिओ काढून महिला तसेच कुटुंबातील सदस्य हे फोटो व्हिडिओ आपापल्या समाज माध्यमावर जसे कि whatsaap status तसेच Instagram अशा विविध platfrom वर शेअर करत असतात व याचाच गैरफायदा घेत भुरटे चोर किंवा चोरी, दरोडा करणारे गुन्हेगार आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतात,
याचीच काळजी घेण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.नागनाथ पाटील यांनी ज्यांचा घरी गौरी स्थापना झालेल्या आहेत त्यांनी घरातील सोने, सोन्याचे दागिने,पैसा, असा शृंगार ऐवज गौरीवर परिधान केलेला असेल तर आणि त्याचे फोटो काढून आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर तसेच इतर समाजमाध्यमांवर शेअर केलेले असतील तर आजच्या दिवशी तसेच यानंतरही काळजीपूर्वक लक्ष द्यावे.तसेच घरातील सर्वांनी सावध व सतर्क राहवे,असे आवाहन केले आहे.

घरातील सजावटीचे फोटो व्हिडिओ शेअर केल्याने व पाहून त्याचाच फायदा घेऊन चोर/भामटे चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही,

यापूर्वी असे गुन्हे घडले आहेत म्हणून सावधगिरी बाळगा आणि सतर्क रहावे व सर्वांनी आपले मौल्यवान दागिने पैसे सांभाळावे अशी सावधगिरीची सुचना श्री.नागनाथ पाटील सहायक पोलिस निरीक्षक वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.





